मुंबई - इंग्लडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेटच्या मॅचवर सट्टा चालवणाऱ्या दोन बुकींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ग्रांट रोड येथील बलवास हॉटेलमध्ये शनिवारी ही कारवाई केली.
विश्वास किशन टाकलकर (वय ५१) आणि अजय कांतराज (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. न्युझीलंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्या सामन्यावर सट्टा लावण्यात आला होता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये बुकींकडून १ लाख ९३ हजार रुपयांचे ८ मोबाईल, एलसीडी टीव्ही, तसेच ९ हजार रुपये रोख रक्कम तसेच एक डायरीदेखील जप्त केली आहे. या डायरीत आतापर्यंत १४ कोटी रुपयांचा सट्टा लावल्याची नोंद आहे.