ETV Bharat / state

मुंबईत बांगलादेशी मामा-भाच्याला अटक; ओळख लपवून शहरात होते वास्तव्य

author img

By

Published : Mar 11, 2020, 7:22 PM IST

शोध घेत असताना रियाजउद्दिन मोहम्मद जैनाबुद्दिन हा युवक पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी या युवकाला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उतरे दिली व पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सखोल चौकशी केली असता रियाजउद्दिनच्या मोबाईलमध्ये बांगलादेशातील मोबाईल नंबर सेव असल्याचे आढळून आले व हा व्यक्ती बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाले.

riyajuddin mohammad arrest sakinaka
अटक केलेले बांग्लादेशी आरोपी

मुंबई- उपनगरातील साकीनाका पोलिसांनी मुंबईत राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे दोन्ही नागरिक आपली ओळख लपवून शहरात राहात होते. रियाजउद्दिन मोहम्मद जैनाबुद्दिन (वय.२२ रा. बांगलादेश) व जाकीर हुसेन अब्दुल मतीन (वय.४५ रा. बांगलादेश) असे अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.

आरोपींबाबात माहिती देताना परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त अंकित गोयल

साकीनाका पोलीस ७ तारखेला रात्रीच्या सुमारास गस्तीवर होती. त्यादरम्यान, पोलिसांना एक संशयित व्यक्ती काजूपाडा हद्दीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार साकीनाकाचे एटीएस पथक संबंधित इसमाच्या मागावर लागले. शोध घेत असताना रियाजउद्दिन मोहम्मद जैनाबुद्दिन हा युवक पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी या युवकाला विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उतरे दिली व पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सखोल चौकशी केली असता, रियाजउद्दिनच्या मोबाईलमध्ये बांग्लादेशातील मोबाईल नंबर सेवा असल्याचे आढळून आले व हा व्यक्ती बांग्लादेशी असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांच्या अधिक चौकशीतून रियाजउद्दिनचा मामासुद्धा मुंबईतल्या मरोळ नाका परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ८ मार्च रोजी त्याचा मामा जाकीर हुसैन अब्दुल मतीन याला सुद्धा बेड्या ठोकल्या. आरोपी अब्दुल मतीन हा साफसफाईचे काम करत असून तो बांग्लादेशी नागरिकांना व त्याच्या नातेवाईकांना भारतात आणण्याचे काम करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मतीन हा मरोल नाका सहार मुंबई येथे राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या बांगलादेशी नागरिकांची अधिक चौकशी केली जात असून त्यांच्या इतर साथीदारांचाही पोलिसांकडून शोध घेतल्या जात आहे.

हेही वाचा- 'तू आमदार आहेस, कुठूनही पैसा आणून दे', जात पडताळणीसाठी आमदारालाच मागितली लाच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.