मुंबई - वरळी येथे शनिवारी लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. वरळीतील हनुमान गल्ली येथील ललित अंबिका या बिल्डींगमध्ये ही दुर्घटना घडली होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. कंपनीचे सुपरवायझर आणि कंत्राटदार या दोघांना एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
आदित्य ठाकरेंनी दिल्या होत्या कारवाईच्या सूचना -
वरळीतील ललित अंबिका या बिल्डींगमध्ये लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर या दुर्घटनेत सहा ते सात जण जखमी झाले होते. यावेळी घटनास्थळी फायर ब्रिगेडचे जवान दाखल झाले होते. त्यांनी बचावकार्य केले व जखमींना मुंबईच्या नायर रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. या प्रकरणी सुपरवायझर आणि कंत्राटदार यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी या दुर्घटनेनंतर घटनास्थळी वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी धाव घेऊन घटनेची पाहणी केली होती आणि दोषींवर कारवाईच्या सूचना देखील दिल्या होत्या.
दुर्घटनेतील मृतांची नावं -
अविनाश दास, लक्ष्मण मंडल, भारत मंडल, चिन्मय मंडल आणि एकाची ओळख पटली नाही.
हेही वाचा - वरळीत इमारतीमधील लिफ्ट कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू