ETV Bharat / state

Mumbai Crime News: गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याकडून चोरले 1 कोटी 18 लाखांचे हिरे; दोघांना मुंबईतून ठोकल्या बेड्या - हिरे लंपास

गुजरातमधील एका प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्याला चांगल्या दर्जाचे हिरे खरेदी करायचे आहे, अशी बतावणी करून हिरे दाखविण्यास सांगून हातचलाखीने १ कोटी १८ लाखांचे हिरे लंपास केले. या प्रकरणी दोघांना गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षाने मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. कांदीवली आणि लालबाग परिसरातून या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा ताबा गुजरात पोलिसांकडे देण्यात आला आहे.

Mumbai Crime News
हिरे चोर
author img

By

Published : Apr 3, 2023, 7:19 AM IST

मुंबई : गुजरातच्या सुरत, महिधरपुरा येथील रहिवासी असलेल्या हिरे व्यापारी धर्मेश पवाशिया यांच्याशी यातील आरोपी हिरे दलाल मुकेश गोपनी (वय ४०) आणि नरेश सरवैया (वय ३४) यांनी फेब्रुवारीमध्ये संपर्क साधला. या दोघांनीही या दोघांनीही त्यांना व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात अद्वितीय हिरे खरेदी करायचे असल्याचे सांगत गोड बोलून पवाशिया यांना आपल्या जाळ्यात ओढले. पवाशिया हे हिरे दाखविण्यासाठी तयार झाल्यानंतर हे दोघेही १८ फेब्रुवारीच्या दुपारी १२ च्या सुमारास पवाशिया यांच्या दुकानात पोहचले.

हिरे लंपास केले : हिरे बघायला आलो असल्याची बतावणी त्यांनी केली. या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन पवाशिया यांनी त्यांच्याकडील चांगल्या प्रतीचे हिरे दाखविले. त्यानंतर या दोघांनीही चहा मागितला. चहा आल्यानंतर जाणूनबुजून एकाने चहा सांडवत पवाशिया यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. तर, दुसऱ्याने हातचलाखीने १ कोटी १८ लाखांचे हिरे लंपास केले. हिऱ्यांच्या जागी काचेचे तुकडे ठेऊन दोघेही निघून गेले. पवाशिया यांना संशय आला. त्यांनी हिरे तपासून बघितले असता हिऱ्यांच्या जागी काचेचे तुकडे असल्याचे त्यांना दिसले.

आरोपींचा शोध : अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने पवाशिया यांनी महिधरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी भारतीय दंड संविधान कलम ४२०, १२० (ब) आणि ११४ अन्वये गुन्हा दाखल करुन गुजरात पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने केलेल्या प्राथमिक तपासात दोन्ही आरोपी हे मुंबईतील असल्याची माहिती समोर आली. गुजरात पोलिसांकडून याची माहिती मिळताच गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षाचे प्रमुख मिलिंद काठे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला.

गुन्ह्याची कबुली : आरोपी गोपानी हा कांदिवली आणि त्याचा साथिदार सरवैया हा लालबागमधील रहिवासी असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. व्यवसायाने हिरे दलाल असलेल्या दोन्ही आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. तसेच दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. अखेर या आरोपींना गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुजरात पोलिसांकडून माहिती मिळताच अवघ्या सात तासांत आरोपींना जेरबंद करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले.

हेही वाचा : Diamonds Nab In Surat : आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 कोटींचे हिरे पकडले, दोघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.