ETV Bharat / state

Tunisha Sharma death case: तुनिषा शर्माच्या मृत्यूबाबात उर्फी जावेदची प्रतिक्रिया, म्हणाली आपण त्याला.... - अभिनेत्री तुनिषा शर्माचे नुकतेच शीझान खानसोबत

आघाडीची अभिनेत्री तुनिषा शर्माने नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तीचे कुटुंब तसेच संपूर्ण सिनेइंडस्ट्री त्याबद्दल हळहळ व्यक्त करत आहे. परंतु, तुनिषाच्या मृत्यूबाबत तिच्या आईने तुनिषाचा सहकलाकार शीझानवर काही आरोप लावले आहेत. (Tunisha Sharma death case) तसेच, त्याबद्दर इतर कलाकारही आपले मत व्यक्त करत आहेत. दरम्यान, यावर आता आपल्या हटके ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाणारी उर्फी जावेदची प्रतिक्रिया समोर आली आहे. तीने तुनिषाच्या मृत्यूला शीझान खानला जबाबदार धरू शकत नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Image
फोटो
author img

By

Published : Dec 29, 2022, 9:31 PM IST

मुंबई - उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्रामवर याबाबत लिहले आहे. तुनिशाच्या बाबतीत मला वाटले की, शीझान खान चुकीचा असेल, कदाचित त्याने तिची फसवणूक केलीही असेल, पण तिच्या मृत्यूसाठी आम्ही त्याला दोषी ठरवू शकत नाही असे थेट तीने लिहले आहे. तसेच, कुणीही त्या पात्रतेचे असू शकत नाही की आपण त्याच्यासाठी आपला जीव द्यावा असही ती मुलींना उद्देशून या पोस्टमध्ये म्हणत आहे. कधी-कधी वाटू शकते की जगाचा अंद आहे. परंतु, माझ्यावर विश्वास ठेवा असे नाही. (Urfi Javed's reaction to Tunisha Sharma) तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांबद्दल विचार करा किंवा फक्त स्वतःवर थोडे अधिक प्रेम करण्याचा प्रयत्न करा. तुमचा स्वतःचा तुम्ही हिरो व्हा. असही ती यामध्ये म्हणत आहे. तसेच, आत्महत्या करूनही दु:ख संपत नाही, मागे राहिलेल्यांना आणखी त्रास होतो अशी खंतही तीने व्यक्त केली आहे. दरम्यान, यावर अभिनेत्री कंगना रणावत हीनेही प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते, तुनिषा शर्माची आत्महत्या नसून ती हत्या आहे.

काका काकूंचीही चौकशी - दास्तान-ए-काबुल' शोच्या सेटवर तुनिषाने आत्महत्या केली आहे. अभिनेत्री तुनिषा शर्माचे नुकतेच शीझान खानसोबत ब्रेकअप झाले होते. त्यासंदर्भात पोलीस शीजान खानची कसून चौकशी करत आहेत. एएनआयच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील वालीव पोलिसांनी बुधवारी तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा, तिचे काका पवन शर्मा आणि तिच्या ड्रायव्हरला या प्रकरणी त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवले. शीजन खान तपासाला सहकार्य करत नसल्याचे वालीव पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, आज तुनिषाच्या आईसह काका काकूंचीही चौकशी करण्यात आली आहे.

शीजानच्या आई आणि बहिणीला पोलीस चौकशी - तुनिषाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला होता. परंतु तो मोबाईल अनलॉक असल्याने पोलिसांनी मोबाईलमधील चॅट आणि कॉलचे डिटेल्स मिळत नव्हते. मात्र आता मोबाईल अनलॉक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तुनिषाच्या फोनचे लॉक उघडण्यासाठी वालीव पोलिसांनी अॅपल कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते. त्यांनी मोबाईल पोलिसांना अनलॉक करुन दिला. तुनिषाचा मोबाईल अनलॉक होताच तुनिषाच्या आईचे आणि शीजानच्या आईचे मेसेज आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, शिजानच्या बहिणींनी देखील तुनिषाला मेसेज केले होते. त्यामुळे शीजानच्या आई आणि बहिणीला पोलीस चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दोघांचं ब्रेकअप झालं होतं - तुनिषा शर्माच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप सहकलाकार आणि तिचा एक्स-बॉयफ्रेंड शीजान खान याच्यावर आहे. शीजाननं आपल्या मुलीला फसवलं असा आरोप तुनिषाच्या आईनं केला आहे. शीजानचे आणखी काही मुलींशी संबंध होते आणि याची माहिती तुनिषाला मिळाल्यामुळे दोघांचं ब्रेकअप झालं होतं. याच तणावात तुनिषानं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी आता शीजानच्या चौकशीत त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडचा शोध लावला आहे. वालीव पोलिसांनी संबंधित मुलीची ओळख पटवली आहे. पण तिचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही. तसंच शीजानच्या सीक्रेट गर्लफ्रेंडसोबतचे डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर करण्याचं काम केलं जात आहे. पोलीस तपासादरम्यान तुनिषाने जेव्हा आत्महत्या केली, त्यादिवशी शीजानने सीक्रेट गर्लफ्रेंडसोबत जवळपास एक ते दीड तास बातचीत देखील केली होती. याचा तपास देखील पोलिसांनी आता सुरु केला आहे.

महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या - दरम्यान, तुनिषा शर्माचा जन्म ४ जानेवारी २००२ रोजी चंदीगडमध्ये झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. अवघ्या १४व्या वर्षी तिची भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप या मालिकेसाठी निवड झाली होती. या मालिकेत तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती. त्याच वर्षी तिने चक्रवर्ती अशोक सम्राट या टीव्ही मालिकेत राजकुमारी अहंकाराची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर तिने गब्बर पुंचवाला आणि शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.