ETV Bharat / state

Tulsi Vivah : कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करतात साजरा - तुळशी विवाहाची पद्धत

तुळशी विवाह ( Tulsi Vivah ) दिवशी विष्णूचा तुळशीसोबत विवाह लावला जातो. कार्तिक एकादशी ( Kartik Ekadashi ) पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा करण्याचा उत्सव आसतो. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस तुळशी विवाह असतो. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. तुळशी विवाहचे महत्त्व म्हणेद तुळशी विवाहानंतरच विवहा मुहूर्त सुरू होतात अशी मान्यता आहे.

Tulsi Vivah
तुळशी विवाह
author img

By

Published : Nov 4, 2022, 10:39 AM IST

मुंबई : तुळशी विवाह ( Tulsi Vivah ) दिवशी विष्णूचा तुळशीसोबत विवाह लावला जातो. कार्तिक एकादशी ( Kartik Ekadashi ) पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा करण्याचा उत्सव आसतो. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस तुळशी विवाह असतो. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. तुळशी विवाहचे महत्त्व म्हणेद तुळशी विवाहानंतरच विवहा मुहूर्त सुरू होतात अशी मान्यता आहे.

तुळशी विवाह : अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे ( Tulsi Vivah Significance ) म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह लावला जातो. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात. तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे. तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरासमोर अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते.

तुळशी विवाहाची पद्धत : घरातीलच कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची-तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची - गेरू किंवा विविध रंगांनी रंगरंगोटी केली जाते. बोर, चिंच, आवळा, सिताफळ ठेवतात. कुटुंबातील कर्ता पुरूष किंवा पंडितांना बोलावून तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतात. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात, मांडव म्हणून उसाची खोपटी करतात. त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे. गोवा, दीव आणि दमण येथे तुळशीविवाह सार्वजनिकरीत्या साजरा होतो. तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात सरकारी इतमामात मिरवणूक ( Tulsi Vivah Ritual ) निघते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.