मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव शुक्रवारपासून पूर्णपणे भरून वाहू लागला आहे. त्यामुळे सध्या लागू असलेली पाणी कपात लवकरच रद्द केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईला भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, विहार, मोडक सागर, तुळशी या तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो. भातसा तलावातून सर्वाधिक पाणी पुरवठा होतो. तर तुळशी आणि विहार या 2 तलावांमधून सर्वात कमी पाण्याचा पुरवठा होतो. यंदाचा जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने तलावात पाणीसाठा वाढतो आहे.
तुळशी तलाव गुरूवारीच काठोकाठ भरला होता. त्यांनर शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास तुळशी तलाव भरून वाहू लागला. मागील वर्षी 9 जुलै रोजी हा तलाव भरला होता. सध्या तलावांमध्ये 6 लाख 35 हजार 659 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असून तो एकूण पाणीसाठ्याच्या 43.92 टक्के इतका आहे.
तलावातील पाणीसाठा -
तलावाचे नाव | दशलक्ष लिटर | टक्के |
मोडकसागर | १०५८७८ | २.१२ |
तानसा | ९८४४३ | ७.८५ |
मध्य वैतरणा | १२३९२३ | ४.०३ |
भातसा | २८४१७४ | ३९.६३ |
विहार | १५२९६ | ५५.२३ |
तुळशी | ७९४४ | ९८.७४ |