मुंबई Truckers Protest : देशभरात ट्रक चालकांनी केंद्र सरकारच्या नवीन कायद्याविरोधात संप पुकारला आहे. ट्रक चालकांच्या या संपाचा फटका व्यापार वाहतुकीलाही बसला आहे. त्यामुळं अन्न आणि औषध प्रशासनानं पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी हस्तक्षेप करण्यासाठी विनंती केली आहे. त्यामुळं पेट्रोल डिझेल, सिलेंडर, आदी वस्तूंचा पुरवठा पोलीस संरक्षणात करण्यात येणार आहे.
नवीन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप : केंद्र सरकारनं नवीन वाहन कायदा आणला आहे. या कायद्याच्या तरतुदीनुसार एखादा अपघात झाल्यानंतर चालक घटनास्थळावरुन पळून गेल्यास त्याला 10 हजार रुपये शिक्षा किंवा 7 लाख रुपयाच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं ट्रक चालकांनी केंद्र सरकारच्या या नवीन कायद्याविरोधात संप पुकारला आहे. मात्र ट्रक चालकांनी पुकारलेल्या या संपामुळं व्यापार वाहतूक ठप्प झाली आहे.
पेट्रोल डिझेल आणि सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम : ट्रक चालकांनी पुकारलेल्या या संपाचा फटका व्यापार वाहतुकीला झाला आहे. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलसह सिलेंडर वहातुकीलाही या संपाचा फटका बसला आहे. पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेनं नागरिक पेट्रोल पंपावर रांगाच रांगा लावत आहेत. त्यामुळं पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडत आहे.
पोलिसांना हस्तक्षेप करण्याची विनंती : ट्रक चालकांच्या संपाचा व्यापर वाहतुकीला फटका बसत असल्यानं अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं पोलीस विभागाला विनंती केली आहे. सोमवारी पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी नागरिकांनी पंपावर गर्दी केली. त्यानंतर अन्न आणि नागरि पुरवठा विभागानं पोलिसांना हस्तक्षेप करण्याची विनंती केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. पेट्रोल, डिझेल, सिलेंडर पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या चालक वाहकांवर ESCO कायद्यानुसार कारवाई करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं. ट्रक चालकांनी पुरवठ्यात अडथळा आणून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं केली आहे.
हेही वाचा :