ETV Bharat / state

केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर ट्रक चालकांचा संप मागे, वाचा काय आहे प्रकरण - ट्रक चालकांचा संप

Truck driver Strike Update : 'हिट अँड रन' कायद्यात केंद्र सरकारने नवीन बदल केल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणता ट्रक चालकांनी आंदोलन पुकारलं. त्यावर काल मंगळवार (2 जानेवारी) उशिरा तरतुदी लागू करण्यापूर्वी चर्चा करू असे आश्वासन केंद्र सरकारने दिल्यानंतर ट्रान्सपोर्ट संघटनांनी संप मागे घेतला.

Truck Drivers Strike Ends After the Central Govt
केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर ट्रक चालकांचा संप मागे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 11:33 AM IST

मुंबई : Truck driver Strike Update : देशभरात ट्रक आणि टँकर चालकांनी पुकारलेला संप काल रात्री उशिरा मागे घेतला. केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला. यानंतर आता ट्रक चालक पुन्हा आपल्या कामावर रुजू होणार असल्याची माहिती देण्यात आली. या संपामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात अनेक पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परंतु, अनेकांना पेट्रोल न मिळाल्यानं मोठं नुकसानही सहन करावं लागलं. दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लांबलचक रांगा येथे लागलेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीही झाली. हे असं संपूर्ण मुंबापुरीत चित्र होतं. संपामुळे आपल्याला पेट्रोल मिळणार नाही या भीतीने गाडीची टाकी फुल करणारांची संख्याही मोठी होती. त्यामुळे पेट्रोल साठा घटला होता.

संप मागे घेतल्यानंतर मुंबईत स्थिती : ट्रक, टँकर चालकांनी संप मागे घेतला असला तरी लगेच सर्व सुरळीत झालेलं नाही. दादरच्या फळभाजी मार्केटमध्ये नेहमीसारखे भाज्यांचे ट्रक आलेले नाहीत. दादर मार्केटमध्ये सकाळच्यावेळी प्रचंड गर्दी असते, ती आज नाही. यामध्ये फळभाज्यांचे ट्रक मोठ्या प्रमाणात आलेले असतात. पण आज ट्रक कमी संख्येने आले असल्याने भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटलीय. त्याचा परिणाम दरांवर झाला असून मुंबईकरांना आज महागड्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागतोय.

आताचा बदल काय : काल रात्री केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये बराचवेळ चर्चा झाली. त्यामध्ये केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा आणखी लागू झालेला नाही असं स्पष्ट केल्यानंतर संप माघारीचा निर्णय झाला. दरम्यान, 'हिट अँड रन' कायद्यातील तरतुदीमुळे ट्रक आणि टँकर चालकांनी बेमुदत संप पुकारला होता. आतापर्यंत कायद्यात हिट अँड रन केसमध्ये 2 वर्ष शिक्षेची तरतूद होती. त्यामध्ये सहज जामिन मिळून जायचा. परंतु, नव्या तरतुदीप्रमाणे आता 10 वर्ष तुरुंगवास आणि 7 लाख रुपयापर्यंत दंड लागू शकतो, अशी तरतूद आहे. याच्या विरोधातच हे सर्व ट्रक, टँकर चालक संपावर गेले होते.

हेही वाचा :

१ गृह सचिवांची ट्रक चालकांच्या प्रतिनिधींसोबतची बैठक यशस्वी; संप मागं घेण्याचं आवाहन

टँकर चालकांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल; पाहा व्हिडिओ

ट्रक चालक संप : 'गरज भासल्यास पेट्रोल पंपला पोलीस संरक्षण दिलं जाईल'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.