ETV Bharat / state

अकोल्यातील मूर्तिजापुरात ट्रकचालक युवकाची दगडाने ठेचून हत्या - sheikh kaleem sheikh waseem murder akola

मृत शेख वसीम शेख कलीमच्या गळ्याला दुप्पटा होता व तो आवळलेल्या अवस्थेत होता. मृतदेह दिसून आल्याने त्याचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, त्याचा चेहरा दगडाने ठेचून छिन्नविछिन्न केलेला आहे. त्यामुळे, त्याची हत्या आधी कशाने करण्यात आली, हे अद्याप अस्पष्ट आहे.

26 year old truck driver died akola
मृत ट्रक चालक
author img

By

Published : May 5, 2020, 11:11 AM IST

अकोला- २६ वर्षीय ट्रक चालकाची गळा आवळून तसेच दगडाने ठेचून निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ४ मे च्या मध्यरात्री मूर्तिजापूर येथील मोहम्मदीय प्लॉट परिसरातील शेत शिवारात घडली. आज ही घटना उघडकीस आली आहे. शेख वसीम शेख कलीम असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

खडकपुरा भागात राहणारा शेख वसीम शेख कलीम (वय.२६) हा ट्रक चालक म्हणून काम करीत होता. सोमवारी संध्याकाळी तो ट्रक घेऊन घरी पोहोचला. त्यानंतर, रात्री ८ वाजता जेवण करून तो घराबाहेर पडला. मात्र, रात्रभर घरी न परतल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. दरम्यान, मंगळवारी सकाळी देवरण रोडवरील मोहम्मदीया प्लॉटला लागून असलेल्या शेत शिवारात त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.

मृत शेख वसीम शेख कलीमच्या गळ्याला दुप्पटा होता व तो आवळलेल्या अवस्थेत होता. मृतदेह दिसून आल्याने त्याचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, त्याचा चेहरा दगडाने ठेचून छिन्नविछिन्न केलेला आहे. त्यामुळे, त्याची हत्या नेमकी कशाने करण्यात आली हे अद्याप अस्पष्ट आहे. त्याचबरोबर, खूनाचे कारणही अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, शहर ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, दिपक इंगळे घटनास्थळी पोहोचले असून, पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा- अकोला मनपामध्ये वैद्यकीय सेवा वगळता 2 दिवस संपूर्ण लॉकडाऊन- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.