ETV Bharat / state

टीआरपी प्रकरण : पार्थो दासगुप्ताकडून पुन्हा जामीन याचिका दाखल - टीआरपी घोटाळा

टीआरपी प्रकरणातील 15 पैकी 14 आरोपींना जामीन मिळाला असताना मला जामीन का देण्यात येत नाही? असा प्रश्न करत पार्थो दासगुप्ता यांनी जामीनाची मागणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. नाईक यांच्यासमोर केली.

पार्थो दास गुप्ता
पार्थो दास गुप्ता
author img

By

Published : Feb 16, 2021, 11:46 AM IST

Updated : Feb 16, 2021, 7:12 PM IST

मुंबई- बहुचर्चित टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर या संदर्भात आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आलेली आहे. यातील 14 जणांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे. मात्र, बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता याला अद्यापही जामीन मिळाला नसून सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयमध्ये पार्थो दासगुप्ता यांच्याकडून जामिनासाठी पुन्हा एकदा याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

टीआरपी प्रकरणातील 15 पैकी 14 आरोपींना जामीन मिळाला असताना मला जामीन का देण्यात येत नाही? असा प्रश्न करत त्याने जामीनाची मागणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. नाईक यांच्यासमोर केलेली आहे.

मुंबई पोलिसांनी जामीनास केला विरोध

पार्थो दासगुप्ता यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होत असताना मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हणण्यात आलेलं आहे की, काही निवडक वृत्तवाहिन्यांना टीआरपी वाढवून देण्यासाठी बार्ककडून करण्यात आलेल्या अफरातफरीची माहिती याच संस्थेतील एका महिला अधिकाऱ्याने तिच्या वरिष्ठांकडे केली होती. मात्र, या महिला अधिकाऱ्यांचे ऐकून न घेता पार्थो दासगुप्ता यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. उलट त्या महिलेला तिच्या पदावरून हटवण्यात आल्याचाही मुंबई पोलिसांनी दावा केलेला आहे.

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्याकडून पार्थो दासगुप्ता यांना टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी 40 लाख रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात आले होते. याबरोबरच परदेश पर्यटनासाठीसुद्धा दोन वेळा 12 हजार अमेरिकन डॉलर देण्यात आले होते. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी व पार्थो दासगुप्ता या दोघांनी एकेकाळी एका संस्थेत काम केले होते.

Last Updated : Feb 16, 2021, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.