ETV Bharat / state

Mumbai Terror Attack : २६/११  मुंबई दहशतवादी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण; राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली - Mumbai Terror Attack

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात ( 26/11 Mumbai terror attack ) शहिद झालेल्या वीर जवानांना ( Tributes paid to martyrs ) पंतप्रधान नरेंद्र मोदी, ( Prime Minister Narendra Modi ) राज्यपाल भगतशिंह कोशारी, ( Governor Bhagat Singh Koshari ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ( Chief Minister Eknath Shinde ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली ( Modi paid tributes to the martyrs of the Mumbai terror attack ) वाहिली.

26/11 Mumbai Terror Attack
26/11 Mumbai Terror Attack
author img

By

Published : Nov 26, 2022, 7:20 PM IST

Updated : Nov 26, 2022, 7:43 PM IST

मुंबई - 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतशिंह कोशारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. 14 वर्षांपूर्वी 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात लोक 166 जणांनी प्राण गमावले होते तसेच 300 जण जखमी झाले होते.

भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मोदी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलताना 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. “आज मुंबई दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्तीही आहे. 14 वर्षांपूर्वी, जेव्हा भारत आपली राज्यघटना, नागरिकांच्या हक्कांचा उत्सव साजरा करत होता, तेव्हा मानवतेच्या शत्रूंनी भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले त्यांना मी श्रद्धांजली ( Modi paid tributes to the martyrs of the Mumbai terror attack ) अर्पण करतो,” असे पंतप्रधान म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली - तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Nationalist Congress MP Supriya Sule ) यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकात जाऊन श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेलबाहेर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 2008 मध्ये, 10 लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईत अंदाधुंद गोळीबार केला होता. या भीषण हल्यात 166 लोक मारले गेले होते तसेच 300 जण जखमी झाले होते.

२६/११ च्या दहशतवादी

खरे गुन्हेगार सुटणार नाही - जयशंकर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ( External Affairs Minister S Jaishankar ) म्हणाले की, मुंबई हल्ल्यातील दोषींना न्याय देण्यासाठी भारत काम करत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त ते म्हणाले की, भारत या संदर्भात अनेक देशांसोबत काम करत आहे. 'हा एक असा प्रसंग संपूर्ण देशाच्या लक्षात आहे. न्यायप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या घटनेत सहभागी असलेले खरे गुन्हेगार सुटणार नाहीत याची काळजी घेऊ, असे जयशंकर म्हणाले.

खरे गुन्हेगार सुटणार नाही - जयशंकर

जवांनाचा देशाला अभिमान - काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण दिले त्यांचा देशाला अभिमान आहे. भारत हिंसाचाराच्या विरोधात नेहमीच ठाम आहे आणि राहील असे ट्विट त्यांनी केले आहे.

दिव्या साळसकर

तो काळा दिवस विसरता येणार नाही - दुसरीकडे, दहशतवादी हल्ल्याच्या 14 व्या वर्धापनदिनानिमित्त, शहीदांच्या कुटुंबीयांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुंबईचे पोलीस हवालदार जयवंत पाटील यांची भाची दिव्या पाटील म्हणाली, "आम्ही माझे काका जयवंत पाटील यांना हल्ल्यात गमावले आहे. 14 वर्षे उलटून देखील ती घटना अजूनही विसरू शकत नाही. दहशतवादी हल्ल्यामुळे झालेले नुकसान कधीही भरून काढता येणार नाही' असे त्या म्हणाल्या.

  • I lost my uncle Jaywant Patil. Several years have gone by, and we still can't forget it. But the Govt has at least remembered a lot of things, which is a positive note for us: Divya Patil, niece of Mumbai Police constable Jaywant Patil who lost his life in #MumbaiTerrorAttack pic.twitter.com/Ky0IEF7gPP

    — ANI (@ANI) November 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी सांगताना, पोलीस अधिकारी विजय साळसकर यांची कन्या दिव्या साळसकर हिने मुंबईतील जनतेचे कौतुक करताना सांगितले की, शहरातील जनतेने खूप प्रेम, सहानुभूती दिली आहे. मी या घटनेला कायम विसरण्याचा प्रयत्न करते, मात्र काही घटना विसरता येणाऱ्या नसतात असे त्या म्हणाल्या.

  • Mumbai | I try not to remember it but of course, it is there everywhere. The people of the city have given a lot of love & compassion which makes me and my mother live every day: Divya Salskar, daughter of police officer Vijay Salaskar who lost his life in the #MumbaiTerrorAttack pic.twitter.com/H5BHcWajSu

Last Updated : Nov 26, 2022, 7:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.