ETV Bharat / state

Wadhawan brothers: वाधवान बंधू यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार, याचिकाकर्त्याची उच्च न्यायालयात जनहित याचिका - वाधवान बंधू यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात ईडीने मनी लॉण्डरिंग प्रकरणात हाऊसिंग डेव्हलपमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक धीरज आणि राकेश वाधवान यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Wadhawan brothers) धीरज आणि राकेश वाधवान यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यापूर्वी जनहित याचिका याचिकाकर्ताला एक लाख रुपये डिपॉझिट करण्याचे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.

वाधवान बंधू यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार

author img

By

Published : Dec 20, 2022, 10:47 PM IST

मुंबई - हाऊसिंग डेव्हलपमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक धीरज आणि राकेश वाधवान यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत..यावर आक्षेप घेणाऱ्या जनहित याचिकेत सुनावणीपूर्वी एक लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज मंगळवार (दि. 20 डिसेंबर)रोजी याचिकादाराला दिले आहे. वाधवान बंधू सध्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील कित्येक महिने ते रुग्णालयात दाखल आहेत. (Wadhawan brothers) रुग्णालयाचा 10 वा मजला त्यांनी ताब्यात घेतला असून यामुळे अन्य रुग्ण आणि नागरिकांची गैरसोय होत आहे असा आरोप करण्यात आला आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठापुढे आज याचिकेवर सुनावणी झाली.

वाधवान बंधू रुग्णालयात उपचार घेत असले तरी त्यामुळे याचिकादार कसे बाधित होतात असा प्रश्न न्यायालयाने केला. याचिकादार इरम सय्यद यांनी याबाबत काही छायाचित्रे खंडपीठाला सादर केली. यानंतर न्यायालयाने दोन लाख रुपये नियमानुसार रजिस्ट्रार कार्यालयात जमा करण्याचे निर्देश दिले. याचिकादार दोन लाख रक्कम जमा करू शकत नाहीत आणि एवढी मोठी रक्कम लावली तर अन्य जनहित याचिका करणारे पुढे येणार नाहीत असे याचिकादारांकडून सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने एक लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले.

काय आहे प्रकरण - पंजाब अँण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ४३५५ कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान आणि कंपनीचे प्रमोटर राकेश वाधवान यांच्यासह दलजीत सिंग पाल, गुरुंनाम सिंग होठी आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. राकेश वाधवानला अटक करण्यात आली असून तब्बेत खालावल्याने खाजगी रुणलयात दाखल करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.