ETV Bharat / state

'एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पुन्हा राज्य सरकारकडून निधी घेणार' - st employee agitation for salary news

कोरोना महामारीमध्ये सर्वच क्षेत्रात मंदी सुरू झाली आहे. राज्य शासनाकडे मी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी विनंती केली आहे. त्यामुळे, एक-दोन दिवसात या संदर्भात मार्ग निघून एसटी कर्मचाऱ्यांना पगाराचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.

परिवहन मंत्री अनिल परब
परिवहन मंत्री अनिल परब
author img

By

Published : Sep 21, 2020, 6:59 PM IST

मुंबई : कोरोनामुळे गेली सहा महिने एसटीची सेवा कोलमडली होती. आजही लोक एसटीकडे प्रवास करायला धजावत नाही. यामुळे, एसटीचे उत्पन्न घटले आहे. शासनाकडून 550 कोटी रुपये घेऊन दोन महिन्यापूर्वी पगार केला होता. आता पुन्हा राज्य सरकारकडे मागणी केली आहे. उद्या वित्तमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडल्यानंतर निश्चितपणे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाईल, असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज(सोमवार) व्यक्त केला.

एसटी कामगारांच्या वेतनासंदर्भात आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली, त्यावेळी परब बोलत होते. कोरोना महामारीमध्ये सर्वच क्षेत्रात मंदी सुरू झाली आहे. राज्य शासनाकडे मी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी विनंती केली असल्याचे परब म्हणाले. वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक आहे. राष्ट्रकुल बँकांकडून कर्ज घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे, एक-दोन दिवसात या संदर्भात मार्ग निघून एसटी कर्मचाऱ्यांना पगाराचा लाभ मिळेल अशी माझी अपेक्षा आहे, असे परब म्हणाले. कर्तव्यावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मदत देणे बाकी आहे. मराठा आरक्षणातील शहिदांना देखील नोकरी देणे बाकी आहे. येणाऱ्या काही दिवसात सर्व प्रश्न निकाली निघतील अशी अपेक्षा आहे, असेही मंत्री परब यांनी सांगितले.

मनसेने रेल्वेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आज केलेल्या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता परब म्हणाले, रेल्वे प्रवासाची परवानगी देताना सर्व गोष्टींचा विचार केला जाईल. सर्वांगीण विचार करुनच रेल्वे सेवा पूर्णक्षमतेने सुरू करू. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर संकट निर्माण होईल, त्यामुळे, आम्ही रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. रेल्वेमध्ये आणखी कर्मचाऱ्यांना आम्ही प्रवेश दिले आहेत. मात्र, एसटी प्रवासाची तुलना रेल्वेशी होऊ शकत नाही, असे मंत्री परब यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीचा पुनर्विचार करा, अधिकारी महासंघाची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.