मुंबई: राजधानीत दररोज लाखो प्रवासी पर्यटक येतात. मुंबईमध्ये आलेली ही वाहने आणि खासगी बस कशाही प्रकारे कुठेही पार्क केली जातात. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे वृद्ध, महिला तसेच मुलांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून राज्यातून तसेच परराज्यातून येणाऱ्या खासगी बस शहराच्या सीमेवर म्हणजेच दहिसर, मुलुंड, वाशी आदी चेक नाक्यावर थांबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. चेक नाक्यावर इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब निर्माण केले जाईल, अशी घोषणा पालिकेने काही वर्षांपूर्वी केली होती.
सार्वजनिक वाहतुकीची दुरवस्था: मुंबईमध्ये बाहेरून येणारी वाहने जकात, चेक नाक्यावर थांबवून प्रवासी आणि पर्यटकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे विशेष करून बसने प्रवाशांना त्यांच्या इच्छुक स्थळी पोहचवावे लागते. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टचे उत्पन्न वाढवण्यासाठी मुलुंड, दहिसर चेकनाक्यावर ट्राफिक हब तयार करण्याच्या सूचना तत्कालीन पर्यावरण मंत्री आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या होत्या. यामुळे मुंबईमधील प्रदूषण आणि ट्रॅफिक कमी होणार आहे.
संकल्प चित्र बनवण्याचे काम सुरू: मुंबई महापालिकेने चेक नाक्यावर ट्राफिक हब बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत संकल्पचित्र बनवण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच हे संकल्प चित्र बनवले जाईल. प्रशासन हब बनवण्याच्या निविदा काढल्या जातील. त्यानंतर हब उभारण्याचे काम केले जाईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
काय आहे ट्रॅफिक हब? मुंबईमधील वाहने १५ वर्षाची झाल्यावर बाद केली जातात. मात्र मुंबई बाहेरील वाहने १५ वर्षे झाली तरी ती वापरात असतात. त्यामुळे प्रदूषण होते. यासाठी जकात नाके बंद झाले आहेत त्या जागेवर मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग करता येतील अशा पद्धतीने ट्रॅफिक हब उभारले जाईल. त्याठिकाणी रेफ्रेशमेंट आणि खाण्यापिण्याची व्यवस्था असेल. यामुळे प्रवासी याठिकाणी आपली प्रवासाची वाहने बदलून आपला पुढचा प्रवास करतील अशी हि योजना असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मायक्रोसॉफ्ट हबचे लॉन्चिंग: मायक्रोसॉफ्टने 'मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअप्स फाऊंडर्स हब' भारतात मार्च 2022 रोजी लाँच केले होते. हे स्टार्टअप संस्थापकांना त्यांच्या स्टार्टअप प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर मदत करेल. ही कंपनी दिग्गज आणि भागीदारांकडून तंत्रज्ञान आणि टूल्ससह USD 300,000 गुंतवणूक करेल. 'मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअप फाऊंडर्स हब' हे भारतातील स्टार्टअप संस्थापकांसाठी फायदेशीर आहे.
असा होईल फायदा: कंपनीने सांगितले की प्लॅटफॉर्म USD 300,000 पेक्षा जास्त किमतीचे फायदे आणि क्रेडिट ऑफर करते. स्टार्टअप्सना त्यांचा व्यवसाय तयार करण्यासाठी तंत्रज्ञान, साधने आणि संसाधने यांबाबत प्रवेश मिळेल. याचबरोबर स्टार्टअप्स उद्योग तज्ञ आणि मायक्रोसॉफ्ट लर्नसह मार्गदर्शनही करतील. संगीता बावी, डायरेक्टर - मायक्रोसॉफ्ट इंडिया मधील स्टार्टअप इकोसिस्टम यांनी निरीक्षण केले की, हे स्टार्टअप केंद्रांपैकी एक आहे. "मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअप्स फाऊंडर्स हबची निर्मिती शेकडो संस्थापकांना जोडेल.
हेही वाचा: Aaditya Thackeray : अभिभाषणात मविआ सरकारच्या कामांचा समावेश, राज्यपालांची सरकारकडून दिशाभूल; आदित्य ठाकरेंचा आरोप