मुंबई: सरकारी अधिकारी तुकाराम मुंढे यांची 2 महिन्यात दुसरी बदली करण्यात आली. केवळ 2 महिन्यापूर्वीच राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. या पदावर बदली करण्यात आली होती. मात्र काल त्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांची 2 महिन्यातच दुसऱ्यांच्या बदलीमुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार सचिन अहिर यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
आरोग्य विभागात बदली: तुकाराम मुंढे हे कार्यदक्ष अधिकारी आहेत. ज्या विभागात जातील त्या विभागात ते अत्यंत चोख काम करतात. त्या विभागातील अधिकाऱ्यांकडून देखील चूक काम करून घेतात. 2 महिन्यापूर्वीच त्यांची आरोग्य विभागात बदली झाली होती. मात्र आरोग्य विभागात सुरू असलेले काळे धंदे तुकाराम मुंढे उजेडात आणण्याचा प्रयत्न करत होते. ते अजून काही काळ या विभागात कार्यरत राहिले असते.
आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर: या विभागातल्या भ्रष्टाचाराची साखळी तोडण्यात त्यांना यश आले असते. आणि म्हणूनच त्यांची तडकाफडकी बदली केली असल्याचे सचिन अहिरे म्हणाले आहेत. आज मुंबईत विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांची संवाद साधताना सचिन अहिर यांनी हा गंभीर आरोप केला आहे. केवळ अधिकारी बदली करून विभागाला न्याय मिळू शकत नाही. तुकाराम मुंढे अत्यंत प्रामाणिक अधिकारी आहेत. मोठ्या प्रमाणावर त्यांनी आल्याला एक- दीड महिन्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये जाण्याचं काम केलं विशेषतः आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरून अनियमित, अयोग्य काम चाललेला आहे, विचारणा करण्याचं काम केल असल्याचेही यावेळी सचिन आहेर म्हणाले आहेत.
काही आमदारांना विशेष निधी: राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे गटातील काही आमदारांना विशेष निधी दिला जात असल्याचा सचिन अहिर म्हणाले आहेत. मात्र इतर आमदारांना निधी दिला जात नाही. त्यामुळे अस्वस्थ फक्त शिंदे गटात नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये देखील पाहायला मिळत आहे.
राज्यपालाबाबत सगळीकडे नाराजी: प्रताप दिनाच्या निमित्ताने प्रतापगडावर शासकीय कार्यक्रमाच्या आयोजनात उदयनराजे गेलेले नाहीत, त्यांनी राज्यपालांबाबतची नाराजी जाहीर केली आहे. आम्हीही गेल्या अडीच वर्षापासून राज्यपालन बाबत नाराजी व्यक्त करतो. मात्र आता सत्तेतलीच लोकं नाराजी जाहीर करायला लागली आहेत. त्यामुळे याची दखल घेतली जाईल, अशी आशा सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे.