मुंबई- रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच नागपूर विभागातून १३० किलोमीटर प्रतितास वेगनाने रेल्वे धावणार आहे. इटारसी- नागपूर- बल्लारशादरम्यान रेल्वे मार्गाची आरडीएसओच्या पथकाकडून नुकतीची पाहणी झाली. अहवाल येताच रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत १३० किलोमीटर प्रतितास वेगनाने रेल्वेचा सराव घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी दिली.
रेल्वे बोर्डाकडून निर्देश-
रेल्वे बोर्डाकडून ९० ते ११० किलोमीटरच्या गतीने धावणाऱ्या गाड्यांची आणखी गती वाढवण्याचे निर्देश गेल्या काही वर्षांपूर्वी देण्यात आले होते. त्यानंतर भारतीय रेल्वेतील सर्व झोनलकडून तसे प्रयत्न सुरू होते. मध्य रेल्वेकडून यासाठी नागपूर विभागात प्रयत्न सुरू केले होते. त्या प्रयत्नांना यश येताना दिसून येत आहे. मध्य रेल्वेकडून इटारसी- नागपूर- बल्लारशादरम्यान रेल्वे मार्गाची पाहणी करण्यात आली आहे.
रेल्वेची गाडीची होणार चाचणी-
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी सांगितले की, इटारसी नागपूर बल्लारशा दरम्यान १३० किमीच्या वेगाने रेल्वे चालवण्याची पुर्वतयारी पूर्ण झालेली आहे. सध्या आरडीएसओच्या पथकाकडून तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यांचा अहवाल येतात रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी करून घेतली जाणार आहे. त्यांची परवानगी मिळताच हाय स्पीड वाहतूकीची ट्रायल घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार महिन्यात या मार्गावरून प्रतितास १३० किमीच्या वेगाने रेल्वे गाड्या धावणार आहे.
भारतीय रेल्वेचे मिशन रफ्तार-
रेल्वे बोर्डाच्या मिशन रफ्तार याविषयी गेल्या काही वर्षापासून भारतीय रेल्वेच्या सर्व झोनल मुख्यालय अशी चर्चा सुरू होती. रल्वे गाड्यांची १३० किमीपर्यंत गती वाढवण्याकरिता पावले उचलली जातील याकरिता मुख्य रूपात आटोमॅटिक सिग्नल, रेल्वे आणि ओवर ब्रिज, रेल्वे फ्लाई पॅसेंजर ट्रेन बरोबर मेमोचे डेमोला रूपांतर करण्याचा समावेश आहे. त्यानंतर गाड्यांची गती वाढविण्याबरोबर प्रवाशांना सुविधाही मिळू शकेल.