मुंबई - होळीच्या स्वागतावेळी दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या ३२४ वाहनचालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. होळीच्या निमित्ताने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी 'ड्रंक अँड ड्राईव्ह'सोबतच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.
यामध्ये ३२४ जणांवर कारवाई करण्यात आली. तर हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याप्रकारणी २ हजार ९३६ दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच भरधाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी ४४ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच इतर कारणांसाठी २ हजार २३६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.