मुंबई - शहरात मंगळवारी मध्यरात्रीपासून मुसळधार सुरू आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेवर देखील परिणाम झाला आहे. पावसामुळे सायन पनवेल रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली हे. तसेच कुर्ला एलबीएस मार्गावर आणि वडाळा स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचत आहे. पावसाचा फटका रस्ते व रेल्वे वाहतुकीला देखील बसलेला आहे. त्यामुळे मुंबईची तुंबई होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असा इशारा देण्यात आला आहे.