मुंबई: मध्य रेल्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टमिन्स प्लॉटफॉर्म क्रमांक १८ पी.डी. मेलो रोड, मुंबई येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास मुंबई तसेच इतर भागातून बरीच गर्दी होण्याची शक्यता आहे. पूर्व द्रुतगती मार्ग, पी.डीमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड तसेच कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. म्हणून या परिसरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी आणि सर्वसाधारण जनतेची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पूर्व द्रुतगती मार्ग, पी.डीमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड (सर्व बाजू रस्तेसह) वाहतूक नियमन आणि नियंत्रण करण्यात येईल. आज दुपारी 2.45 ते 4.15 वाजेपर्यंत या बदलांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हे पर्यायी मार्ग उपलब्ध असतील : दुपारी 2.45 ते 4.15 वाजेपर्यंत सी.एस.टी. जंक्शन वरून पूर्व मुक्त मार्गाने ने चेंबुरकडे जाणारी वाहने, डी. एन. रोड ने सर जे. जे. ब्रिजवरून दादर-माटुंगा वरून चेंबुर करिता पुर्व दृतगती महामार्गाचा वापर करता येईल. चर्चगेट रेल्वे स्थानकावरून पूर्व मुक्त मार्गाने चेंबुरकडे जाणारी वाहने वीर नरीमन रोडने सीटीओ जंक्शन-हजारी महल सोमानी मार्ग सी.एस.टी. जंक्शन सर जे जे उडड़ण पूल- दादर- माटुंगा वरून चेंबुर करिता पूर्व दृतगती महामार्गाचा वापर करतील. कफ परेड नेव्ही नगर वरुन पूर्व मुक्त मार्गाने ने चेंबुरकडे जाणारी वाहने नाथालाल पारेख मार्ग बघवार पार्क जंक्शन भोसले मार्ग मंत्रालय- गोदरेज जंक्शन- डॉ. आंबेडकर जंक्शन सी. टी. ओ. जंक्शन- हजारी महल सोमानी मार्ग- सीएसएमटी जंक्शन सर जे.जे. ब्रीज वरून दादर- माटुंगा वरून चेंबुर करिता पुर्व दृतगती महामार्गाचा वापर करतील. वाशीहून सीएसएमटी, कुलाबा चर्चगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी ईस्टर्न फ्री वेचा वापर न करता मानखुद-चेंबुर छेडा नगर-सुमन नगर जंक्शन- सायन-माटुंगा दादर भायखळा (पुर्व दृतगती महामार्ग ) सर जे. जे. उडड्ण पूल- सी. एस. एम. टी. जंक्शन वरून इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाय : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंधेरी पूर्व येथील मरोळ कॅम्पस येथे अल्जामिया तस सैफिया येथे एक सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी जागाच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या परिसरातील जनतेची गरसोय टाळण्यासाठी संपूर्ण मरोळ वर्ष रोड (आणि मरोळ चर्च रोडच्या बाजूचे रस्ते), एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशन जंक्शन, अंधेरी घाटकोपर कुर्ला रोड आणि विलेपार्ले (पूर्व) पासून एलिव्हेटेड एअरपोर्ट रोडवरील वाहतूक नियंत्रित आणि नियमन केले जाईल.
'हे' असतील पर्यायी मार्ग : दुपारी 4.30 ते 6.30 वाजेपर्यंत अंधेरी घाटकोपर कुर्ला रोड दोन्ही वाहिन्यांवरील वाहतूक हि साकीनाका जंक्शन येथून मरोळ नाक्याच्या दिशेने येणारी वाहने साकीनाका जंक्शन येथुन साकी विहार रोडने मिलिंद नगर एल. अॅन्ड टी. गेट नं. ८ येथून डावे वळण घेऊन व्हि. एल. आर. रोडने पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे मार्गस्य होतील. बोहरा कॉलनी कडून मरोळ चर्च मार्गे अंधेरी कुर्ला रोडकडे जाणारी वाहतूक कदमवाडीमधुन मरोळ पाईपलाईन या अंतर्गत मार्गाने अंधेरी कुर्ला रोड कडे मार्गस्थ होतील. बोहरा कॉलनी कडून मरोळ चर्च रोड मार्गे मरोळ मरोशी रोड कडे जाणारी वाहतूक ही स्टार पोल्टी फार्म मरोळ चर्च रोड येथे डावे वळण घेऊन अंतर्गत मरोळ गाव मार्गाने सरळ जाउन सावला जनरल स्टोअरजवळ डावे वळण घेऊन मरोळ मरोशी रोड कडे मार्गस्थ होतील.
हेही वाचा : Jammu and Kashmir : उत्तर काश्मीर भागात अनेक ठिकाणी बर्फवृष्टी