मुंबई - दोन वर्ष कोरोना निर्बंधातुन मुक्त झाल्या नंतर आता पुन्हा एकदा सर्व सण उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरे करण्यास सुरुवात झाली आहे. आज गणेश चतुर्थी. यात सर्वांचे लक्ष लागलेले असते ते देशभरातील काही प्रतिष्ठित गणपतींपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाकडे Lalbagh Raja. लालबागचा राजा म्हटले की परंपरा प्रतिष्ठा The Reputation The Tradition ही आलीच. या लालबागच्या राजाला ज्याप्रमाणे भक्तांच्या गर्दीची, भाविकांच्या श्रद्धाची परंपरा प्रतिष्ठा आहे त्यासोबतच वादाची देखील परंपरा आहे. इथं दरवर्षी काही ना काही भांडण वाद होत असतात. यावर्षी मात्र पहिल्या दिवशी येथे महिला सुरक्षारक्षकांसोबत राडा झाल्याची घटना Lalbagh Raja Rada on The First Day घडली आहे.
नेमके काय झाले - लालबागचा दर्शनाला दरवर्षी कोट्यावधी भाविक दहा दिवसात दर्शन घेत असतात. तर रोज लाखो भाविक दर्शन घेतात. यात इथल्या कमिटी पुढे सगळ्यात मोठा आव्हान असते म्हणजे या गर्दीवर नियंत्रण मिळवणे आणि व्यवस्थापन करणे. या गर्दीमुळेच इथे दरवर्षी वाद झाल्याचं आपण पाहिला आहे. मात्र यावर्षी आज पहिल्याच दिवशी राडा झाल्याने पुन्हा लालबाग चर्चेत आला आहे.Lalbagh came into discussion again झाले असे की, इथे मुखदर्शनसाठी व पद दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा आहेत. मुखदर्शनाच्या रांगेत असलेल्या एका महिलेचा इथल्या काही महिला सुरक्षारक्षकांशी वाद झाला. यावेळी दर्शनासाठी आलेल्या महिलेने तिथल्या सुरक्षारकांनी रक्षकांना धक्काबुक्की देखील केल्याचे निदर्शनास आले. मात्र पोलिसांनी यात तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
हेही वाचा Ganesh Chaturthi 2022: गोदावरीच्या राजाची मुंबईवारी; मनमाड कुर्ला एक्सप्रेस मध्ये गणरायाची स्थापना