ETV Bharat / state

राणीबागेत पट्टेरी तरसाच्या जोडीचे आगमन; पर्यटकांना फेब्रुवारीपासून पाहता येणार

राणीबागेच्या आधुनिकीकरणाला वेग आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ८५ टक्के विकासकाम पूर्ण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी या बागेत पेंग्विनचे आगमन झाल्यापासून पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. राणीबागेत पेंग्विन आणि बारासिंगानंतर आता हिंस्र प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पट्टेरी तरसाची जोडी आणण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून हे तरस पर्यटकांना पाहता येणार आहेत.

rani
राणीबागेत पट्टेरी तरसाच्या जोडीचे आगमन
author img

By

Published : Jan 4, 2020, 8:13 PM IST

मुंबई - पालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबाग म्हणजे बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण आहे. याठिकाणी असणाऱ्या प्राणी, पक्षी, झाडे आणि फुलांच्या विविध प्रजातींसाठी हे उद्यान प्रसिद्ध आहे. राणीबागेत पेंग्विन आणि बारासिंगानंतर आता हिंस्र प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पट्टेरी तरसाची जोडी आणण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून हे तरस पर्यटकांना पाहता येणार आहेत.

राणीबागेत पट्टेरी तरसाच्या जोडीचे आगमन

राणीबागेच्या आधुनिकीकरणाला वेग आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ८५ टक्के विकासकाम पूर्ण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी या बागेत पेंग्विनचे आगमन झाल्यापासून पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. लवकरच याठिकाणी वाघ, सिंह, झेब्रा, चित्ता, जिराफ, चिंपाझी, शहामृग, इमू, कांगारु, आफ्रिकन हायना, बिबट्या, सोनेरी कोल्हा, अस्वल आदी देशी-विदेशी प्राणी-पक्षी आणले जाणार आहेत. राणी बागेत प्राण्यांसाठी नॅशनल झू ऍथॉरिटीने सुचवलेल्याप्रमाणे नव्या पद्धतीचे पिंजरे बांधण्याचे काम सुरु आहे. जानेवारीच्या पंधरावड्यात हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर प्रदर्शनीय भागात पर्यटकांना पाहण्यासाठी ते ठेवले जातील, अशी माहिती राणीबाग प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा - वाघांकडून हरणाची शिकार, पेंच राष्ट्रीय उद्यानातील थरार कॅमेऱ्यात कैद

राणीबागेत पिंजऱ्यांचे काम पूर्ण होत आले असल्याने दोन दिवसापूर्वी तरसाची जोडी आणण्यात आली आहे. कर्नाटकातील चमाराजेंद्र प्राणिशास्त्र उद्यानाने ही जोडी दिली आहे. यात ३ वर्षांचा नर तर, २ वर्षांच्या मादीचा समावेश आहे. तरसांचे आयुर्मान २५ वर्ष असते. तरस हिंस्र प्राणी असल्याने त्यांच्यासाठी सुरक्षित पिंजरे बनवण्यात आले आहेत. त्यांना खाण्यासाठी रोज चिकन, रेडा आणि म्हशीचे मटण दिले जाणार आहे. दरम्यान, प्राण्यांच्या खेळांवर बंदी घातल्यानंतर सर्कसमधून हळूहळू प्राणी गायब झाले. परिणामी, सर्कसच्या माध्यमातून घडणारे प्राण्यांचे दर्शनही दुर्मिळ झाले. परंतु आता आफ्रिका, ऑस्ट्रेलियातील काही प्राणी जिजामाता उद्यान प्राणीसंग्रहालयात आणले जाणार असल्याने मुंबईकरांना ते पाहण्याची संधी मिळणार आहे.

Intro:मुंबई - मुंबईची राणीबाग म्हणजे बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण. याठिकाणी प्राणी, पक्षी, झाड, आणि फुले पाहून बच्चे कंपनी भलतीच खुश होते. बच्चे कंपनीच्या खुशीत आता आणखी वाढ होणार आहे. बच्चे कंपनीच्या आवडत्या अशा राणीबागेत पेंग्विन, बारासिंगानंतर आता हिंस्त्र प्राणी म्हणून ओळखले जाणारे पट्टेरी तरस आणण्यात आले आहेत. पुढील महिन्यापासून या तरसाना बच्चे कंपनी आणि पर्यटकांना पाहता येणार असल्याची माहिती वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाकडून देण्यात आली आहे. Body:पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे आधुनिकीकरणाला वेग आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ८५ टक्के विकासकाम पूर्ण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी राणीबागेत पेंग्विन आणल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. लवकरच याठिकाणी वाघ, सिंह, झेब्रा, चित्ता, जिराफ, चिंपाझी, शहामृग, इमू, कांगारु, आफ्रिकन हायना, बिबट्या, सोनेरी कोल्हा, अस्वल आदी देशी- विदेशी प्राणी- पक्षी आणले जाणार आहेत. राणी बागेत प्राण्यांसाठी नॅशनल झू ऍथॉरिटीने सुचवलेल्याप्रमाणे नव्या पद्धतीचे पिंजरे बांधण्याचे काम सुरु आहे. जानेवारीच्या पंधरावड्यात हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर प्रदर्शनीय भागात पर्यटकांना पाहण्यासाठी ते ठेवले जातील, अशी माहिती राणीबाग प्रशासनाने दिली. राणीबागेत पिंजऱ्यांचे काम पूर्ण होत आले असल्याने तरसाची जोडी दोन दिवसापूर्वी आणण्यात आली आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाला कर्नाटकातील चमाराजेंद्र प्राणिशास्त्र उद्यानाकडून ही जोडी देण्यात आली आहे. यामधील नर ३ वर्षाचा तर मादी २ वर्षाची आहे. त्यांचे आयुर्मान २५ वर्ष इतके असते. तरस हे हिंस्त्र असल्याने त्याप्रमाणे सुरक्षित पिंजरे बनवण्यात आले आहेत. त्यांना खाण्यासाठी रोज चिकन, रेडा आणि म्हशीचे मटण दिले जाणार आहे. दरम्यान, प्राण्यांच्या खेळांवर बंदी घातल्यानंतर सर्कसमधून हळूहळू प्राणी गायब झाले. परिणामी सर्कसच्या माध्यमातून मुंबईकरांना घडणारे प्राण्यांचे दर्शनही दुर्मिळ झाले. परंतु आता आफ्रिका, ऑस्ट्रेलियातील काही प्राणी जिजामाता उद्यान प्राणीसंग्रहालयात आणले जाणार असल्याने मुंबईकरांना ते पाहण्याची संधी मिळणार आहे.

काय आहे तरस -
तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे. हा प्राणी आफ्रिका व आशिया खंडांमध्ये आढळतो. या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला 'लाफिंग ॲनिमल' (हसणारा प्राणी) असेही म्हणतात. तरस मांसभक्षक असतो. पट्टेरी तरस भारत, नेपाळ, पाकिस्तान तसेच मध्य पूर्वेतील देश व उत्तर आफ्रिका, केनिया, टांझानिया, अरबी द्वीपकल्पात आढळतात. भारतात उत्तर भारत, मध्य प्रदेशात तरस सापडतात. भारतात सध्या सुमारे १००० ते ३००० तरस आहेत. तरी तरसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बातमीसाठी vivo - vis Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.