ETV Bharat / state

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या.. - महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटना

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना, पाऊस यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

todays news update
आजच्या महत्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Jul 24, 2021, 9:36 AM IST

Updated : Jul 24, 2021, 1:42 PM IST

  • मुंबई -
    राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या असून यामध्ये दुर्दैवाने 76 जणांचा बळी गेला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळईमध्ये 32 घरांवरती दरड कोसळल्याने तब्बल 47 जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. तर 41 जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(शनिवारी) महाडच्या पूरग्रस्त आणि दरडग्रस्त घटनास्थळाचा पाहणी दौरा करणार आहेत.
    सविस्तर वाचा -
  • टोकियो -
    भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले. तिने 49 किलोग्राम गटात आज शनिवारी रौप्य पदकाची कमाई केली. भारतीय वेटलिफ्टिंग इतिहासात हे दुसरे पदक आहे. याआधी भारताने सिडनी ऑलिम्पिक 2000 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. या ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्र्वरीने भारताला पदक जिंकून दिले होते.
    सविस्तर वाचा...
  • मुंबई -
    राज्यात मागील तीन दिवसांपासून सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे, तर काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 59 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. तरी अद्याप या भागात बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत पूरग्रस्त भागातून सुमारे 90 हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. तर या दरम्यान 75 जनावरांचाही मृत्यू झाला आहे.
    सविस्तर वाचा...
  • पुणे -
    पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका हॉटेल मालकावर खुनी हल्ला करण्यात आला होता. हॉटेलच्या बाहेर फोनवर बोलत बसलेल्या एका व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीने कोयत्याने सपासप वार करत खून करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेत रामदास आखाडे (वय 38) गंभीर जखमी झाले होते. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.
    सविस्तर वाचा...
  • टोकियो -
    ऑलिंपिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय नेमबाजी पथकाला मोठा धक्का बसला आहे. तर इलेव्हनिल वलारीवन आणि अपूर्वी चंदेला दोघेही महिलांच्या 10 मीटर एअर रायफल पात्रता स्पर्धेत अनुक्रमे 16 व 36 व्या क्रमांकावर समाधान मानले. त्यामुळे भारताच्या नेमबाजीत पदक मिळवण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत. शनिवारी असाका शुटिंग रेंजवर पात्रता फेरी घेण्यात आली.
    सविस्तर वाचा...
  • हैदराबाद -
    आज प्रत्येकजण झपाट्याने विविध आजारांच्या कचाट्यात सापडत आहे. फळ आणि भाजीपाल्यांवर वापरले जाणारी कीटकनाशके हे त्यामागील प्रमुख कारण आहे. शेतकरी पिकांवर रोग आल्यानंतर आणि अळ्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी कीटकनाशकांचा वापर करतात. करनाल जिल्ह्यातील नसीरपूर गावातील शेतकरी जगतराम हे देखील अशाच काही आजाराने व्यथित होते. यामुळे त्यांनी निश्चय केला आणि विषमुक्त शेतीला सुरूवात केली. तब्बल 13 वर्षापूर्वी त्यांनी झिरो बजेट शेतीला सुरूवात केली. आज ते इतरांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. ते शेतकऱ्यांना झिरो बजेट शेतीसह सेंद्रिय शेतीबद्दलही मार्गदर्शन करतात. कारण शेतकऱ्यांनी किमान आपल्या दैनंदिन आहारात तरी शुद्ध सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या विषमुक्त पालेभाज्यांचा वापर करावा.
    सविस्तर वाचा...
  • भीमाशंकर (पुणे) -
    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू असलेल्या नुतनीकरणाच्या कामांमुळे भीमानदी उगमाचा प्रवाह बंद झाला होता. या बंद झालेल्या प्रवाहामुळे पावसाचे पाणी हे थेट मंदिरात गाभाऱ्यात जाऊन शिवलिंग पाण्याखाली गेले होते. याच दरम्यान ईटीव्ही बातमी दाखविल्यानंतर पुरातन आणि महसूल विभाग खडबडून जागे होत शुक्रवारी भीमाशंकर मंदिर परिसरात पहाणी केली. या परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामाच्या काही त्रुटींमुळे पावसाचे पाणी हे मंदिरात गेले.
    सविस्तर वाचा...
  • पुणे -
    गेल्या दोन दिवसांपासुन भीमाशंकर परिसराला अतिवृष्टीने झोडपले आहे. सततच्या धो-धो मुसळधार पावसाने भिमाशंकर परिसरातील भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील धरणाच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
    सविस्तर वाचा...
  • भूवनेश्वर -
    अतिवृष्टी झाल्याने महाराष्ट्र आणि गोव्याला मदत करण्यासाठी ओडिशामधील एनडीआरएफची आठ पथके महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. एका पथकामध्ये 25 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. यातील चार पथके पुण्यात बचावकार्य करतील. दोन टिम रत्नागिरी जिल्ह्यात आणि दोन गोव्यात काम करतील. भारतीय वायुसेनेच्या विशेष उड्डानेद्वारे ही पथके महाराष्ट्र व गोवाकडे रवाना झाली होती.
    सविस्तर वाचा...
  • मुंबई -
    ऐतिहासिक चित्रपटांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून अनेक धनिक निर्मात्यांनी आपली गाडी ऐतिहासिक चित्रपटांकडे वळविली आहे. मराठीमध्येही चांगले चांगले ऐतिहासिक चित्रपट बनत आहेत. ‘बलोच’ त्यातीलच एक ज्यात ‘मुळशी पॅटर्न’ वाले प्रवीण तरडे प्रमुख भूमिकेत दिसतील. शिवकालीन चित्रपटांबरोबरच पेशवे आणि पानिपत वर सुद्धा सिनेमे बनताहेत. मराठा इतिहासातील कायमस्वरूपी लक्षात राहणारी बाब म्हणजे पानिपतचा पराभव. त्या पराभवनानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. पानिपत लढाईनंतरच्या या भयाण वास्तवावर भाष्य करणारा चित्रपट आहे 'बलोच'.

Last Updated : Jul 24, 2021, 1:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.