ETV Bharat / state

Top 10 @ 1PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या.. - imp news

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना, पाऊस यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @ 1 AM
Top 10 @ 1 AM
author img

By

Published : Jul 21, 2021, 6:30 AM IST

Updated : Jul 21, 2021, 1:53 PM IST

  1. मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस तसेच थंड वारे वाहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचबरोबर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सविस्तर वृत्त -
  2. मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा पती राज कुंद्रा कायद्याच्या कचाट्यात चांगलाच अडकले आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी त्यांची चौकशी केली आणि चौकशीअंती त्यांना अटक केली‌. राज कुंद्रावर अश्लील सिनेमे बनवून अॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याचा आरोप आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात सादर करण्यात आले. यानंतर 23 जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात आणखी नवे कनेक्शन समोर येऊ लागले आहेत. याच प्रकरणात शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या दोन्ही अभिनेत्री नावदेखील आता समोर येत आहे. सविस्तर वृत्त -
  3. मुंबई - उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला काल गुन्हे शाखेने अटक केली होती. पॉर्नोग्राफी प्रकरणात ही अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सविस्तर वृत्त -
  4. मुंबई - पेगासस फोन प्रकरण तापणार असल्याची चिन्हे दिसत आहे. या प्रकरणी आता इस्रायलमध्ये गेलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. तसे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप झाल्याचा दावा केला होता. सविस्तर वृत्त -
  5. नवी दिल्ली - महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेगासेस प्रकरणावरुन पंतप्रधानानांवर निशाणा साधला. पेगासस प्रकरण खरे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. सविस्तर वृत्त -
  6. नवी दिल्ली : टिकटॉक चाहत्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे. लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉक भारतात पुनरागमन करण्याच्या तयारीत असून लवकरच हा व्हिडिओ प्लॅटफॉर्म पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टिकटॉकची पॅरेंट कंपनी असलेल्या बाईटडान्स ने TickTock या नव्या ट्रेडमार्कसाठी भारतात अर्ज केल्याचा दावा मुकुल शर्मा नावाच्या एका ट्विटर युझरने केला असून यासोबत बाईटडान्सच्या अर्जासंदर्भातील माहितीही त्याने शेअर केली आहे. त्यामुळे आता टिकटॉक खरंच पुन्हा सुरू होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सविस्तर वृत्त -
  7. मुंबई - मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणांवर बंधने आली असल्याने सर्व धर्मीय सण साधे पणाने साजरे केले जात आहेत. बुधवारी बकरी ईद असून त्यानिमित्त कुर्बाणी देता यावी यासाठी महापालिकेचा देवनार येथील कत्तलखान (पशुवधगृह) २१ ते २३ जुलै दरम्यान सुरू ठेवण्यात आला आहे. येथे दिवसाला ३०० जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती देवनार पशुवध गृहाचे महाव्यवस्थापक योगेश शेटे यांनी दिली. सविस्तर वृत्त -
  8. नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, ऑक्सिजन परिस्थितीबाबत मुंबई मॉडेल स्विकारा, त्यांच्यापासून शिका या शब्दात केंद्र सरकारला फटकारले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर केंद्र सरकार मुंबई मॉडेल स्विकारणार का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केला. ते राज्यसभेत बोलत होते. सविस्तर वृत्त -
  9. मुंबई : घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडींग बाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला असून आता घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरांत प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. स्मार्ट मीटर योजनेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी मंगळवारी निर्देश दिले. राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशांनुसार दुरुस्ती करण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी दिल्या. सविस्तर वृत्त -
  10. मुंबई - पेगासस स्पायवेअरचा वापर करून देशातील विरोधी पक्षातील नेते मंडळी आणि पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले. यानंतर या वृत्ताचे पडसाद संपूर्ण देशभर उमटू लागले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा घेऊन विरोधकांनी गदारोळ केला. तर राज्यातील नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस व विरोधीपक्ष भाजपाच्या नेत्यांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. सविस्तर वृत्त -

Last Updated : Jul 21, 2021, 1:53 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.