ETV Bharat / state

Top 10 @ 1 PM : दुपारी एकवाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना, पाऊस यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @ 1 PM
Top 10 @ 1 PM
author img

By

Published : Jul 10, 2021, 7:42 AM IST

Updated : Jul 10, 2021, 1:37 PM IST

  • मुंबई - ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात गदारोळ सुरू असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पुढील सूचनेपर्यंत स्थगित केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्यात इंपिरीकल डेटा अभावी स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील ओबीसींचे आरक्षण रद्द केले होते. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. सविस्तर वृत्त -
  • मुंबई - राज्यात गेल्या २४ तासांत २०० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून दिवसभरात ८ हजार ९९२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर १० हजार ४५८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०८ टक्के एवढे आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सध्या १ लाख १२ हजार २३१ इतकी आहे. सविस्तर वृत्त -
  • मुंबई - गेल्या काही दिवसांपासून भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका राज्य सरकारने लावला आहे. ३० जूनला सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यानंतर शुक्रवारी पुन्हा सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूरमध्ये तीन अधिकाऱ्यांचे खांदेपालट केली आहे. सविस्तर वृत्त -
  • नवी दिल्ली - आरटीआयमधील माहितीमधून कधी सरकारी अधिकारी अडचणीत येतात. तर कधी विरोधी पक्ष सरकावर टीका करतात. पण, आरटीआयमधील माहिती खूप विश्वसनीय नसते, अशी सर्वोच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान तोंडी टिपण्णी केली आहे. सविस्तर वृत्त -
  • नागपूर- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खासदारकीला आवाहन देणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. त्या याचिकेवर आता ६ ऑगस्टला सुनावणी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि वर्तमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज सादर करताना उत्पन्नाची माहिती लपवल्याचा आरोप या याचिकेत कऱण्यात आला आहे.सविस्तर वृत्त -
  • मुंबई - राज्यातील आपत्ती निवारणासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून कोकणाला ३ हजार ६३५ कोटींचा भरीव निधी दिला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून २ हजार कोटी तर राज्य शासनाच्या इतर निधीतून १६०० कोटी देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दुरदृश्य प्रणालीद्वारे आज बैठक झाली. बैठकीत निधीला तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच दुष्काळ निवारण कार्यक्रम- पेंच प्रकल्प नागपूर हा प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सविस्तर वृत्त -
  • सोलापूर - मुरूम उपसा प्रकरणात आरोपीला मदत करतो म्हणून तब्बल साडेसात लाखांची लाच मागणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने शुक्रवारी करण्यात आली. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सविस्तर वृत्त -
  • चेन्नई - तामिळनाडूत डीएमके सत्तेत आल्यानंतर डीएमके समर्थकाने स्वखुशीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या समर्थकाने पक्षाने विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी प्रार्थना केली होती. उलाकानाथन असे आत्महत्या केलेल्या ६० वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. ते निवृत्त वाहतूक निरीक्षक होते. सविस्तर वृत्त -
  • मुंबई - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी होत असताना, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्टमोडवर आहे. राज्य सरकारकडून येत्या 14 ऑगस्टपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यानंतर १५ टक्केच अधिकाऱ्यांच्या बदल्या करता येतील, असे राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. सविस्तर वृत्त -
  • भोपाळ (मध्यप्रदेश) - रेल्वे रुळावरून मालगाडीचे १२ रेल्वेचे डबे घसरून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात अनूपपूर जिल्ह्यापासून २५ किलोमीटर दूर असलेल्या विलासपूर मार्गावरील निगौरा स्टेशनजवळ घडला आहे. या अपघाता रेल्वेचे डबे थेट नदीच्या पुलावरून खाली कोसळले आहेत. शुक्रवारी ४ वाजता अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. सविस्तर वृत्त -

Last Updated : Jul 10, 2021, 1:37 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.