ETV Bharat / state

Top 10 @ 9 AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

राज्य देशभरातील सकाळी ९ वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...
सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...
author img

By

Published : Jul 5, 2020, 9:07 AM IST

मुंबई - आज गुरुपोर्णिमा, त्या निमित्तान राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या गुरूंबद्दलच्या भावना.. देशात गेल्या २४ तासात २२ हजार ७७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण... महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासातील कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक, आढळले ७ हजार ७४ नवे रुग्ण.. यासह राज्य देशभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

सातारा - 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : 'कसोटीच्या प्रसंगात परिस्थितीवर मात करण्याचे भान देणारे गुरू' - तेजस्वी सातपुते

हैदराबाद - आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासात 22 हजार 771 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 442 जणांचा मृत्यू झाला. या नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 48 हजार 315 इतका झाला आहे. यात 2 लाख 35 हजार 433 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 3 लाख 94 हजार 226 जणांनी कोरोनाला मात दिली आहे. 18 हजार 665 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाचा सविस्तर - देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...

सोलापूर - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात कडक लॉकडाऊन, करावा अशी मागणी केली जात आहे. सोलापूरात लॉकडाऊन करण्यापूर्वी सर्व घटकांशी चर्चा करूनच लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

वाचा सविस्तर - पाच दिवस अगोदर पूर्व सूचना देऊन सोलापुरात संचारबंदी लावणार - पालकमंत्री भरणे

मुंबई - देशांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या महाराष्ट्रात गेले काही दिवस दैनिक 5 हजार कोरोना रुग्णांची काल ६ हजार नोंद झाल़्यानंतर आज पहिल्यांदाच रुग्णांची संख्या सात हजार पार झाली आहे. शनिवारी कोरोनाच्या ७ हजार ७४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ८३ हजार २९५ रुग्णांवर (अॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३ हजार ३९५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ८ हजार ८२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२ टक्के एवढे आहे

वाचा सविस्तर -शनिवारी 7 हजार 74 कोरोनाबाधित; आतापर्यंतचे सर्वाधिक 295 मृत्यू

मुंबई - कोरोना विषाणूचे मुंबईत शनिवारी नवे 1 हजार 180 रुग्ण आढळून आले. तर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांसह मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 82 हजार 814 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा 4 हजार 827 इतका झाला आहे. मुंबईमधून शनिवारी 1 हजार 71 जण कोरोनामुक्त झाले. यासह कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 53 हजार 463 झाला आहे. मुंबईत सध्या 24 हजार 524 सक्रिय रुग्ण असून मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 64 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही माहिती पालिकेच्या आरोग्यविभागाने दिली.

वाचा सविस्तर - मुंबई : 1071 जण कोरोनामुक्त तर नव्या 1180 रुग्णांची भर, कोरोनाग्रस्तांचा आकडा 82814 वर...

नवी दिल्ली - लडाखमधील कारगिल येथे रविवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलमध्ये त्याची तीव्रता 4.7 होती. भूकंपाचे केंद्र 433 किलोमीटर दूर कारगिलच्या उत्तर-पश्चिमेस होते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार, पहाटे 3:37 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.

वाचा सविस्तर - कारगिलला पुन्हा भूकंपाचे धक्के, तीव्रता 4.7 रिश्टर स्केल

मुंबई - देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. असे असताना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्यावतीने (एआयसीटीई) देशभरात चालविण्यात येणाऱ्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार देशातील एआयसीटीच्या अंतर्गत चालणारी सर्व व्यावसायिक महाविद्यालये आणि त्यातील नवीन वर्ग हे 15 सप्टेंबर 2020 पासून सुरू होणार आहेत.

वाचा सविस्तर - एआयसीटीईचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर; 15 सप्टेंबरपासून होणार वर्ग सुरू

नाशिक - कोरोनाबाधित रुग्णाची विचारपूस करायला गेलेल्या महापालिकेच्या आरोग्य पथकावर त्या कोरोनाबाधित रुग्णाने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातील गंजमाळ परिसरात हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील निषेध व्यक्त केला आहे. तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही भुजबळ यांनी यावेळी दिला आहे. या हल्ला प्रकरणातील संशयित रुग्णाला भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाचा सविस्तर -कोरोना रुग्णाची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या मनपाच्या आरोग्य पथकावर रुग्णाचा हल्ला

बुलडाणा - जिल्ह्यातील नांदुरा शहरातील गांधी चौकातील आशिष नवगजे यांच्या मालकीची ३ मजली इमारत आज शनिवारी ४ जुलैला सायंकाळी ६.३० वाजे दरम्यान अचानक पत्यासारखी कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. ही इमारत ३४ वर्ष जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे.

वाचा सविस्तर -बुलडाण्यातील ३ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली; जीवितहानी नाही

कोल्हापूर- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ सुरुच आहे. शनिवारी दिवसभरात आणखी 23 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कालपर्यंत एकूण बाधितांची संख्या 927 वर पोहोचली आहे तर त्यातील 738 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.176 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

वाचा सविस्तर - कोल्हापूरमध्ये कोरोनाचे 23 रुग्ण वाढले; 6 जण कोरोनामुक्त

सातारा - राष्ट्रवादीतून निवडून आल्यानंतर खासदारकीचा राजीनामा देत, भाजपवाशी झालेले राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या, महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत भेटीगाठी वाढल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.

वाचा सविस्तर -हाविकास आघाडीतील नेत्यांच्या उदयनराजेंच्या 'जलमंदीर पॅलेस'च्या वाऱ्या वाढल्या, चर्चांना उधान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.