ETV Bharat / state

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या! - farm act news

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!

author img

By

Published : Jan 14, 2021, 9:29 AM IST

Updated : Jan 14, 2021, 1:15 PM IST

  • मुंबई - राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात आता राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक आयोगाकडे भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी तक्रार दाखल केली असून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या लग्नाबद्दल व मुलांबद्दल माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, कायदा काय म्हणतोय या बाबत अ‌ॅड. असीम सरोदे यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

वाचा सविस्तर -धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार का? काय म्हणतोय कायदा

  • मुंबई : धनंजय मुंडे प्रकरणी आता संजय राऊतांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही गोष्टी खासगी, कौटुंबिक असतात त्या तशाच पद्धतीने सोडवल्या गेल्या पाहिजेत. कौटुंबिक गोष्टींमध्ये राजकीय भूमिका नको असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

वाचा सविस्तर -कौटुंबिक गोष्टींमध्ये राजकीय भूमिका नको; मुंडे प्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

  • वर्धा - 'सामान्य टोळ वट्वट्या' हा हिवाळ्यात एक ठिकाणाहून दुसऱ्या भागात स्थलांतर करणारा पक्षी आहे. पक्षी निरीक्षणा दरम्यान हा पक्षी जिल्ह्यात प्रथमच आढळला आहे. बहार नेचर फाउंडेशनचे पक्षीअभ्यासक दिलीप वीरखडे यांनी हा पक्षी पवनार येथील धामनदी परिसरात दिसल्याचे नोंदवले आहे. पवनारच्या धाम किनाऱ्यावरील झुडपात हा पक्षी अभ्यासक दिलीप वीरखडे यांना आढळला.

वाचा सविस्तर -वर्धा जिल्ह्यात प्रथमच टोळ वटवट्याची नोंद

  • बीजिंग - जगभरात कोरोनाचा प्रसार होवून आता एक वर्ष होत आले आहे. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूचा फैलाव नक्की कोठून झाला? कोणत्या प्राण्यापासून झाला? याचा वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे शोध लागला नाही. चीनमधील वुहान शहरातील मांस बाजारातून कोरोना जगभरात पसरला असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, त्यास योग्य असे पुरावे अद्यापही मिळाले नाहीत. याच सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटनेचे पथक वुहान शहरात दाखल झाले आहे.

वाचा सविस्तर -कोरोना प्रसाराचं मूळ शोधण्यासाठी WHO ची टीम चीनमध्ये दाखल

  • नागपूर - संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या नावाने महाराष्ट्रात निर्माणाधीन असलेल्या दोन पालखी महामार्गांचा सर्वंकष विकास आणि सुशोभीकरण यासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ‘या दोन महामार्गांचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता त्यांचे सुसंगतरीत्या सुशोभीकरण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वाचा सविस्तर - पालखी महामार्गांच्या सुशोभीकरणासाठी सूचना पाठवा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आवाहन

  • मुंबई - केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून शिवसेनेचे मुखपत्र सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे. सरकारने न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलक शेतकऱ्यांवर बार उडवला आहे. न्यायालयाने जरी कायद्यांना स्थगिती दिली असली तर आंदोलन गुंडाळले गेल्यावर सरकार स्थगिती उठवून कायदे पुन्हा लागू करेल, ही भीती शेतकऱ्यांत असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

वाचा सविस्तर - 'मोदी, मोठे व्हा' शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून सामनातून पंतप्रधानांवर हल्लाबोल

  • मुंबई - मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सी लिंकवर अधिक भर दिला जात आहे. त्यानुसार आता मुंबईत लवकरच आणखी एका सी लिंकची भर पडणार आहे, ती म्हणजे नरिमन पॉईंट ते कफ परेड सी लिंकची. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)ने हा प्रकल्प काही वर्षांपूर्वी हाती घेतला होता. मात्र, काही कारणाने हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. आता मात्र हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेत याचा अभ्यास करण्यासाठी एमएमआरडीएने नुकतीच एक निविदा मागवली आहे.

वाचा सविस्तर -बासनात गुंडाळलेला नरिमन पॉईंट-कफ परेड सी-लिंक मार्गी लागणार; एमएमआरडीएने मागवली निविदा

  • देहराडून - मकर संक्रांती सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी सुर्याचे उत्तरायण सुरू होते. धनू राशीतून सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजेच १४ जानेवारीनंतर दिवस मोठा आणि रात्र लहान होण्यास सुरूवात होते. उत्तराखंड राज्यात यास उत्तरायणी असे म्हणतात. संक्रांतीच्या दिवशी भाविक गंगा नदीत अंघोळ करण्यासाठी येतात. यावेळी हरिद्वारमधील घाटांवर भाविकांची मोठी गर्दी होते.

वाचा सविस्तर-मकर संक्रांतीला हरिद्वारमध्ये गंगा किनारी भाविकांची अलोट गर्दी

  • मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला करण सजनानी सोबत असलेल्या संबंधांबद्दल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पकडून अटक करण्यात आली. त्यानंतर समीर खान यांच्या बांद्रा परिसरातील घरावर यांचे एनसीबीने छापेमारी केली आहे.

वाचा सविस्तर -समीर खान यांच्या घरावर एनसीबीचे छापे; कायद्यापेक्षा कोणी मोठा नसल्याची मलिकांची प्रतिक्रिया

  • मुंबई - औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केल्याचा वाद ताजा असतानाच पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटर हँडलवरून उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आला आहे. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटर हँडलवर देताना धाराशिव(उस्मानाबाद) असा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर-शिवसेनेने काँग्रेसला पुन्हा डिवचले; सीएमओवर उस्मानाबादचे झाले धाराशिव

Last Updated : Jan 14, 2021, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.