ETV Bharat / state

Top 10 @ 11 PM : रात्री 11 वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10
Top 10
author img

By

Published : Sep 17, 2020, 9:00 AM IST

Updated : Sep 17, 2020, 11:18 PM IST

  • नवी दिल्ली - मोदी सरकारने संसदेत मांडलेल्या तीन शेतीविषयक विधेयकांच्या निषेध व्यक्त करत केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांचे पती शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी लोकसभेत आज (गुरुवारी) त्यांच्या राजीनाम्याबाबत घोषणा केली.

वाचा सविस्तर - हरसिमरत कौर बादल यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा; एनडीएत फूट?

  • मुंबई - पूर्ण आसन क्षमतेने एसटी प्रवास उद्या 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली आहे. त्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे व हात निर्जंतुक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर - उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने एसटी प्रवास सुरू; राज्य सरकारची परवानगी

  • मुंबई - राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला असून २४ तासात २४ हजार ६१९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात १९ हजार ५२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ३९८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३१ हजार ३५१ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईमध्ये संचारबंदी पुन्हा लागू करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर - राज्यात कोरोनाचा उद्रेक; २४ हजार ६१९ नव्या रुग्णांची नोंद, ३९८ मृत्यू

मुंबई - राज्यात मेगा पोलीस भरती करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार राज्यातील साडेबारा हजार पोलिसांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या निर्णयाला मराठा समाजाकडून कडाडून विरोध सुरू झाल्यानंतर आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजासाठी १३ टक्के जागा शिल्लक ठेवून इतर जागांवर भरती करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

वाचा सविस्तर - 'पोलीस भरती करताना मराठा समाजाला १३ टक्के जागा रिक्त ठेवू'

  • मुंबई - सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास) संस्थेसह मराठा समाजाच्या योजना राबवण्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग केली आहे. मराठा नसलेले मंत्री मराठा समाजाला न्याय देणार नाही या भावनेतून मराठा समाजाने ही मागणी केली होती. त्यांची मागणी मान्य करत राज्य सरकारने अखेर शासनादेश जारी करत नियोजन विभागाकडे ही जबाबदारी दिली.

वाचा सविस्तर - ...अखेर मराठा समाजाच्या योजनांची जबाबदारी अजित पवारांकडे

  • नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे कोरोना लस कधी येणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यावर आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी माहिती दिली. पुढील वर्षांच्या सुरुवातील कोरोना लस उपलब्ध असेल, असे त्यांनी सांगितले. संसदेत पावसाळी अधिवेशनादरम्यान ते बोलत होते.

वाचा सविस्तर - 'कोरोना लस 2021च्या सुरवातील उपलब्ध असेल'

  • औरंगाबाद - मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनावरून आता औरंगाबादेत राजकारण रंगताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला ऑनलाइन हजेरी लावली. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली. मी गैरहजर असल्यावर मला देशद्रोही म्हणून घोषित करता, मग मुख्यमंत्री आले नाही तर ते देशभक्त कसे, असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन उपस्थित केला आहे.

वाचा सविस्तर - ...तर मुख्यमंत्री देशभक्त कसे, खासदार इम्तियाज जलील यांची टीका

  • लातूर - निलंगा तालुक्यातील औराद शाहजनी येथे सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे अनेक घरात आणि दुकानात पाणी घुसले आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे. आज दुपारी ढगफुटी सदृष्य झालेल्या पावसामुळे औरादपासून दोन किलोमीटर अंतरावर जामखंडीकडे जाणारा पुल पाण्याखाली गेला. तर, याच पुलावरून जात असलेला ट्रक पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पलटी झाला.

वाचा सविस्तर - औराद शाहजनीत पावसाचं थैमान; १२० मीमी पावसाची नोंद, पुलावरील पाण्यामुळे ट्रक पलटी

  • नंदुरबार - नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील न्हावी गल्ली परिसरातील एका घराला भीषण आग लागली आहे. या घरात बनावट ऑईल बनवण्याचा कारखाना होता. या घटनेत ५ घरे जळून खाक झाली आहेत. आगीचे रौद्ररूप पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वाचा सविस्तर - विसरवाडीत बनावट ऑईल कारखान्याला भीषण आग, ५ घरे जळून खाक

  • नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी विविध विषयांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. आज त्यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीबद्दल पुन्हा केंद्र सरकारला धारेवर धरले. रोजगार हा सन्मान आहे. सरकार कधीपर्यंत त्यांना हा सन्मान देण्यास मागे हटणार? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी एक वृत्त शेअर केले आहे. वृत्तानुसार देशात 1 कोटी लोक रोजगार मागत असून 1.77 लाख नोकऱ्या उपलब्ध आहे.

वाचा सविस्तर -'रोजगार हा सन्मान, तो देण्यास कधीपर्यंत सरकार मागे हटणार?'

  • नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 97 हजार 894 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 51 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी याबाबत माहिती दिली.

वाचा सविस्तर -देशातील कोरोना रुग्णांची संख्या ५१ लाखांवर; एकूण चाचण्यांनी ओलांडला सहा कोटींचा टप्पा...

  • नवी दिल्ली - काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील 2016मध्ये शिक्षक भरतीची परीक्षा दिलेल्या 50 युवकांसोबत चर्चा केली. बेरोजगारी ही एक राजकीय मुद्दा नसून मानवतावादी प्रश्न आहे, असे यावेळी म्हणाल्या. तसेच यासंदर्भात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

वाचा सविस्तर - 'बेरोजगारी हा राजकीय मुद्दा नाही, तर मानवतावादी विषय'

  • नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेमध्ये भारत-चीन सीमा परिस्थितीचा आढावा सादर केला. सध्या आपण चर्चेतून सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने दोन्ही देशांच्या लष्करादरम्यान बैठका सुरू आहेत. शांततेच्या मार्गानेच यातून तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असे सिंह म्हणाले.

वाचा सविस्तर -'चीनच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक; सीमेवर आपलेही जवान सज्ज'

Last Updated : Sep 17, 2020, 11:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.