ETV Bharat / state

Top १० @ 5 PM : सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, वाचा एका क्लिकवर...

सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, वाचा एका क्लिकवर...

top-10-news-today-5-pm
सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या
author img

By

Published : Jun 19, 2020, 1:25 PM IST

Updated : Jun 19, 2020, 5:22 PM IST

नवी दिल्ली - देशामधील सर्व राज्यांमध्ये कोरोना चाचणीच्या दरात समानता ठेवा. त्यासाठी राज्य सरकारांबरोबर मिळून काम करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. अनेक राज्यांमध्ये कोरोना चाचणीची वेगवेगळे दर आहेत. त्यावरून न्यायालयाने हे आदेश दिले...तसेच पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली भागात सोमवारी(15 जून) रात्री भारत आणि चीनच्या सैनिकामध्ये हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही देशांच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, गुरुवारी चर्चेनंतर चीनने 10 भारतीय जवनांची सुटका केली आहे. यामध्ये चार अधिकाऱ्यांचाही समावेश आहे...यासह महत्वाच्या १० बातम्या..

  • नवी दिल्ली - देशामधील सर्व राज्यांमध्ये कोरोना चाचणीच्या दरात समानता ठेवा. त्यासाठी राज्य सरकारांबरोबर मिळून काम करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. अनेक राज्यांमध्ये कोरोना चाचणीची वेगवेगळे दर आहेत. त्यावरून न्यायालयाने हे आदेश दिले.

सविस्तर वाचा- देशभरात कोरोना चाचणीच्या शुल्कात समानता ठेवा, सर्वोच्च न्यायालय

  • नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली भागात सोमवारी(15 जून) रात्री भारत आणि चीनच्या सैनिकामध्ये हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही देशांच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, गुरुवारी चर्चेनंतर चीनने 10 भारतीय जवनांची सुटका केली आहे. यामध्ये चार अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

सविस्तर वाचा - भारत- चीन सीमा वाद: चीनच्या ताब्यातील 10 भारतीय जवानांची सुटका

  • संचारबंदी जाहीर झाल्यापासून देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले. या दरम्यान सर्वाधिक फटका कामगार आणि मजूर वर्गाला बसला. रोजंदारीवर घर चालत असल्याचे त्यांची उपासमार सुरू झाली. यानंतर मजूरांनी जमेल त्या मार्गाने घर जवळ करण्यास सुरुवात केली. दरम्याच्या काळात केंद्र सरकारने विविध योजनांसाठी पॅकेज जाहीर केले. यासंबंधी ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. या विशेष मुलाखतीत त्यांनी शेती, कामगार, शेतमजूर, शहरी मजूर तसेच लॉकडाऊन दरम्यान झालेले स्थलांतर यावर प्रकाश टाकला.

सविस्तर वाचा- विशेष मुलाखत : कोरोनावर सरकारचे उपाय म्हणजे पॅकेज नव्हे..निव्वळ 'पॅकेजिंग', पी. साईनाथ यांची टीका

  • सोमवारी (14 जून) लडाखच्या पूर्वेला असलेल्या गलवान व्हॅली प्रांतात चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले. यानंतर दोन्ही देशांमधील सीमावाद पुन्हा उफाळून आला. चिनी सैन्य मागे हटण्यास तयार नसल्याने वातावरण तापले. यानंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू झाली. गलवान व्हॅलीमध्ये दोन्ही सैन्यांची झटापट झाली आणि यामध्ये २० भारतीय जवानांना वीरमरण आहे. चिनी सैन्याची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली. याच पार्श्वभूमीवर संरक्षणतज्ज्ञ नितीन गोखले यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. सीमेवर करण्यात आलेली घुसखोरी चीनने जाणूनबुजून केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या वाढत्या महत्त्वाला शह देण्यासाठी ही चीनची रणनीती असल्याचे त्यांनी म्हटले.

सविस्तर वाचा - विशेष मुलाखत : 'चीनची पावलं जाणीवपूर्वक, भारताच्या वाढत्या महत्त्वाला शह देण्याची रणनीती' - नितीन गोखले

  • नवी दिल्ली - आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. त्यांना अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा देण्यास सुरुवात केली आहे. गुरूवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर त्यांना न्यूमोनियाही झाल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा- सत्येंद्र जैन यांची प्रकृती गंभीर; न्यूमोनियाचे झाले निदान..

  • मुंबई - पूना मर्चंट्स चेंबर्सच्या शिष्टमंडळासह वालचंद संचेती तसेच पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळासह फतेचंद रांका यांनी आज (शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापारी व दुकानदारांच्या अडचणींसंदर्भात त्यांनी पवारांना निवेदन दिले.

सविस्तर वाचा- व्यापाऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करावे; शरद पवारांकडे व्यापाऱ्यांची मागणी

  • बीड - अनेक प्रकारचे दुर्मिळ बियाणे जतन न केल्यामुळे संपुष्टात येत आहेत. काही बिया तर अशा आहेत की, त्याची नावे देखील अनेकांना माहीत नाही. जांभळी हळद, काटेरी काकडी, गोड मिरची, असामी लिंबू, काळा वाटाणा, लाल हादगा, कश्मीरी लसून यासारख्या अनेक वाणाच्या बिया आपण कधी पाहिल्या देखील नाहीत. मात्र, बीडच्या श्रुती अरुण ओझा या बीएस्सी झालेल्या तरुणीने सर्व बिया जतन करून ठेवल्या आहेत. देशातील विविध राज्यांमधील अत्यंत दुर्मीळ बियांचे जतन करून त्या बिया नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम बीडच्या या बीज कन्येने राबवला असून देशभरात 18 हजाराहून अधिक नागरिकांना तिने या दुर्मीळ बिया पोस्टाने पाठवल्या आहेत.

सविस्तर वाचा - गोड मिरची, काटेरी काकडी, जांभळी हळद पाहलीय का? बीडच्या बीजकन्येने जपलाय अनोखा ठेवा

  • मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत गेल्या १४ जून रोजी वांद्रे येथील घरामध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेली ६-७ महिने तो डिप्रेशनच्या त्रासाने त्रस्त झाला होता. परंतु त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

सविस्तर वाचा - सुशांतसिंह राजपूतच्या जीवनावर बनणार सिनेमा, फर्स्ट लूक आला समोर

  • कोलंबो - 2011 च्या विश्वकरंडक स्पर्धेतील यजमान भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील अंतिम सामना 'फिक्स' होता, असा आरोप श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंदा अल्थागामगे यांनी केला आहे. या दाव्यानंतर, श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आणि माजी फलंदाज महेला जयवर्धने यांनी त्यांना पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. 2 एप्रिल 2011 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेला अंतिम सामना भारतीय संघाने सहा गडी राखून जिंकला. श्रीलंकेला अंतिम सामन्यात सलग दुसर्‍यांदा पराभव पत्करावा लागला.

सविस्तर वाचा - ''2011च्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामना फिक्स होता''

Last Updated : Jun 19, 2020, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.