पुणे - काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा खळबळजनक दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला असल्याची बातमी आज एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. यावर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
वाचा सविस्तर -'...असे मी म्हणलोच नाही,' गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कानावर हात
मुंबई - अभिनेत्री पायल घोषने केलेल्या आरोपांबाबत दिग्दर्शक अनुराग कश्यपने मौन सोडले आहे. पायलचे आरोप बिनबुडाचे असून, आपण स्वतः कोणत्याही महिलेला त्रास देत नाही, तसेच आपल्या आजूबाजूलाही अशा घटना होऊ देत नसल्याचे अनुरागने म्हटले आहे.
वाचा सविस्तर-"पायलचे आरोप बिनबुडाचे; तसे प्रकार ना करतो, ना होऊ देतो", अनुरागचे स्पष्टीकरण
ठाणे - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर, जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा आरक्षणासाठी ठाण्यात साखळी उपोषण करण्यात येत आहे.
वाचा सविस्तर-आरक्षण द्या.. नाहीतर रस्त्यावर उतरू; ठाण्यात मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू
मुंबई - आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरले असून मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडून स्थगिती उठवावी आणि आरक्षणाचा निर्णय लागल्यावर पोलीस भरती करावी, अशी मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
वाचा सविस्तर-मुंबई : आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर; 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन
औरंगाबाद - यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने दरवर्षी राज्य पातळीवरील 'भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार देण्यात येतो. २०२० चा हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रावसाहेब उर्फ रा. रं. बोराडे यांना देण्यात आला.
वाचा सविस्तर -भगवानरावजी लोमटे राज्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब बोराडे यांना प्रदान
मुंबई - काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा गौप्यस्फोट एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नाही, असे म्हणत त्या अधिकाऱ्यांविषयी नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे.
वाचा सविस्तर - पोलिस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; गृहमंत्री अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा
नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 92 हजार 605 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 54 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली.
वाचा सविस्तर- ९२ हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५४ लाखांवर!
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्त्यावर पाठवण्यात आलेल्या एका पाकिटात विष आढळले आहे. कायदा अंमलबजावणी विभागाच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. ट्रम्प यांच्या नावावर आलेली सर्व पत्रे आधी तपासली जातात. त्यामध्ये ही बाब आढळून आली.
वाचा सविस्तर -ट्रम्पना पाठवण्यात आलेल्या पाकिटात आढळले विष!
पंढरपूर(सोलापूर)- उजनी धरण परिसरात आणि भीमा नदीच्या क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने भीमा नदीला पूर आला आहे. भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने चंद्रभागेवरचा जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच पात्रातील काही मंदिरे ही पाण्याणे वेढली गेली आहेत.
वाचा सविस्तर -भीमा नदी दुथडी वाहू लागल्याने सतर्कतेचा इशारा, जुना दगडी पूल पाण्याखाली
मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, लॉकडाऊनमुळे अजूनही मुंबईची लोकल बंद आहे. त्यामुळे स्थानकालगत असणाऱ्या फेरीवाला व छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यात 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी जखमींना मदत करणारा आणि त्या घटनेचा साक्षीदार छोटू चहावालाही आर्थिक संकटात सापडला आहे.
वाचा सविस्तर-ईटीव्ही भारत विशेष : 26/11 मुंबई हल्ल्यातील साक्षीदार छोटूला काहीतरी सांगायचंय !