- मुंबई : राज्यात आज ५,७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ९९ हजार ९६७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९,६१५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४३ हजार ७१४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सविस्तर वाचा : राज्यात ९,६१५ नव्या कोरोना रुग्णांसह २७८ मृत्यूंची नोंद; पाहा तुमच्या जिल्ह्यातील आकडेवारी..
- मुंबई - दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आज (शुक्रवार) मुंबईत 1 हजार 62 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 6 हजार 891 वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा 5 हजार 981 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 1 हजार 158 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 78 हजार 260 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या 22 हजार 647 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 73 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 64 दिवसांवर पोहोचला आहे.
सविस्तर वाचा : मुंबईत आज 1 हजार 62 नवे रुग्ण, तर 1 हजार 158 रुग्णांची कोरोनावर मात
- नवी दिल्ली - भारतीय बनावटीच्या कोरोना लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी आज(शुक्रवार) सुरु करण्यात आली आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स(एम्स) मध्ये ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरु झाली आहे. आज एका 30 वर्षीय व्यक्तीला लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
सविस्तर वाचा : भारतीय बनावटीच्या 'कोव्हॅक्सिन'ची मानवी चाचणी; एम्समध्ये ३० वर्षीय व्यक्तीला दिला पहिला डोस
- मुंबई - सहा महिन्यानंतरही जगभरातील कोरोनाची दहशत काही संपताना दिसत नाही. अमेरिका, भारत, ब्राझीलसारख्या देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता सर्वाचेच लक्ष लागले आहे ते कोरोनावरील लस कधी येणार याकडे. अनेक ठिकाणी कोरोना लसीची मानवी ट्रायल सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या तीन-चार महिन्यात लस येईल अशी आशा अनेक जण बाळगून आहेत. पण कोरोनाची लस 2020 मध्ये नव्हे तर 2021 मध्येच येईल असे तज्ज्ञांनकडून सांगितले जात आहे. त्यामुळे अजून पुढचे काही महिने आपल्याला मास्क, सॅनिटायझर्सचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग आणि घरातच राहणे या सर्व शस्त्रांचा वापर करतच कोरोनाला दूर ठेवावे लागणार असल्याचे ही तज्ज्ञ सांगत आहेत.
सविस्तर वाचा : '2021 मध्येच येणार कोरोनावरची लस, तोपर्यंत मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग हेच शस्त्र'
- मुंबई - पीएमसी बँकेला कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या वाधवान (एचडीआय कंपनी) कुटुंबीयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. याच जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेतील दोन विमानाचा आणि एका बोटीचा लिलाव आता होणार आहे. पीएमसी बँकेकडून ऑगस्टमध्ये हा लिलाव करण्यात येणार आहे. महागडी आणि नामांकित कंपनीची ही विमानं असून आता या लिलवातून पीएमसी बँकेला किती रक्कम मिळते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सविस्तर वाचा : वाधवान कुटुंबाच्या 2 विमानांसह एका बोटीचा ऑगस्टमध्ये लिलाव, पीएमसी बँकेकडून कारवाई
- नाशिक - कोरोनाच्या संकट काळात फडणवीस आणि भाजपाने राजकारण करू नये, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. नाशिक दौऱ्यावर आले असताना अधिकाऱ्यांच्या बैठकी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णपणे कोरोनाच्या कामाला वाहून घेतल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.
सविस्तर वाचा : कोरोनाच्या संकटात फडणवीस अन् भाजपाने राजकारण करू नये - शरद पवार
- मुंबई- 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय निवडणूक आयोगाचे फेसबुक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता. निवडणूक आयोगाने निष्पक्ष संस्था म्हणून काम करणे अपेक्षित आहे. परंतु, हा प्रकार लोकशाही मधील मुलभूत तत्त्वांना धक्का पोहोचवणारा असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केला आहे.
सविस्तर वाचा : 'महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपच्या सोशल मीडिया कंपनीचा वापर'
- नवी दिल्ली - बहुप्रतीक्षित इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सुरुवात 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होऊ शकते. तर, स्पर्धेचा अंतिम सामना 8 नोव्हेंबरला होईल. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी एका वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली.
सविस्तर वाचा : क्रिकेटप्रेमींना खुशखबर! यंदाची आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबरपासून रंगणार
- नवी दिल्ली – टाळेबंदीत अनेकजणांनी घरातील अन्नालाच पसंती दिली आहे, हा समज खोटा ठरविणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात टाळेबंदी असताना चिकन बिर्याणीच्या साडेपाच लाख ऑर्डर करण्यात आल्याचे स्विग्गी या ऑनलाईन फूड कंपनीने म्हटले आहे.
सविस्तर वाचा : टाळेबंदीत ग्राहकांकडून 5.5 लाख चिकन बिर्याणीच्या ऑनलाईन ऑर्डर!
- मुंबई : सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा, 'दिल बेचारा' आज ओटीटीवर प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे, डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा मोफत उपलब्ध करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा : 'हॉटस्टार'वर प्रदर्शित झाला 'दिल बेचारा'; सबस्क्रिप्शनशिवायही पाहता येणार..