- मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात आज फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. २०१६-१७ मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले. यासाठी माझा फोन नंबर अमजद खान नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात केली. सविस्तर वृत्त -
- जत (सांगली) - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जत तालुक्याचे माजी आमदार उमाजीराव धानाप्पा सनमडीकर काका यांचे मंगळवारी पहाटे 6:30 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. सांगली येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सविस्तर वृत्त -
- अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील करंजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी सोमवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान उपकेंद्रातच पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहलेली एक सुसाईड नोट सापडली असून त्यात आरोग्य खात्याच्या वरिष्ठांसह तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या तणावात आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. या घटनेने तालुक्यात आणि जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त -
- जळगाव - 'सुवर्णनगरी' म्हणून देशभर लौकिक असलेल्या जळगावच्या सराफ बाजारावर पुन्हा एकदा मंदीचे सावट निर्माण झाले आहे. सराफ बाजारात कधीकाळी दिवसाला कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असे. मात्र, कोरोना महामारी आली. त्यानंतर संपूर्ण व्यवहार ठप्प झाले. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू ओसरू लागला आणि सराफ बाजारातील व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे सक्तीचे केले. त्यामुळे बाहेरील व्यापारी तसेच ग्राहक सोने खरेदीसाठी येत नसल्याने सुवर्णनगरीत उलाढाल थांबली आहे. याठिकाणची कोट्यवधी रुपयांची उलाढाल आता काही हजारांवर आली आहे. अशा परिस्थितीत सराफ व्यावसायिकांसह सराफ व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सविस्तर वृत्त -
- मुंबई - दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आज (मंगळवारी) संपले. या दोन दिवसीय अधिवेशनात 8 विधेयक मांडत ती मंजूर करण्यात आली. मात्र हे अधिवेशन विरोधकांच्या 12 आमदारांच्या निलंबनामुळे गाजले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजावर बहिष्कार टाकला. बहिष्कार टाकल्यानंतर भाजपाने विधानसभेच्या बाहेर प्रतिसभागृह भरवले आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आरोपांचा पाढा वाचला. सविस्तर वृत्त -
- हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असा ज्याचा लौकिक आहे तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी उर्फ माही. कॅप्टन कुल धोनीला 'हेलिकॉप्टर शॉट'चा जनक म्हणून ओळखले जाते. कर्णधार, फलंदाज, यष्टीरक्षक यातील त्याच्या यशस्वी कामगिरीमुळे धोनी कोट्यवधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला. आज 7 जुलै. आज याच माहीचा 40वा वाढदिवस. धोनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने घेतलेला त्याच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा... सविस्तर वृत्त -
- मुंबई - गेल्या वर्षी तान्हाजी मालुसरेचा बायोपिक केल्यानंतर अभिनेता अजय देवगण अजून एक बायोपिक घेऊन येतोय. ‘तान्हाजी : द अनसंग हिरो’ हा चित्रपट ऐतिहासिक काळातील होता आणि ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया' वॉर-फिल्म आहे. हा चित्रपट १९७१ साली घडलेल्या भारत-पाकिस्तान युद्धातील खऱ्या घटनेवर आधारित आहे. १४ दिवसांत ३५ वेळा हल्ला करून ९२ बॉम्ब्स आणि २२ रॉकेट्स वापरत पाकिस्तान ने हवाईअड्डा उध्वस्त केला होता. तेथील भुज विमानतळाचा कारभार पाहणारे निर्भय आयएएफ-स्क्वाड्रन विजय कर्णिक यांनी, आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, मधापार तालुक्यातील स्थानिक खेड्यातील ३०० महिलांच्या मदतीने संपूर्ण आयएएफ-एअरबेसचे पुन्हा बांधकाम कसे केले हे या चित्रपटाद्वारे प्रेरणाप्रत दर्शविण्यात आले आहे. सविस्तर वृत्त -
- नवी दिल्ली - देशातील १० विरोधी पक्षनेत्यांच्या प्रमुख नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मंगळवारी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करणारे कार्यकर्ता फादर स्टेन स्वामी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या लोकांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. सविस्तर वृत्त -
- मुंबई - रेल्वे परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता देशातील ८१३ रेल्वे स्थानकांवर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. या हायटेक सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये ‘इंटरनेट प्रोटोकॉल' म्हणजे 'आयपी' असणार आहे. यात चेहऱ्यांना ओळखणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे एखादा माणूस गर्दीत घुसला तर त्याचा माग घेणे आता रेल्वे पोलिसांना शक्य होणार आहे. तसेच रेल्वेच्या सुरक्षेत वाढ होणार आहे. सविस्तर वृत्त -
- मुंबई - "तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केलेली धक्काबुक्की आणि शिवीगाळ ही शोभनीय नाही. विधिमंडळाच्या प्रत्येक सदस्यांनी सभागृहाचे पावित्र्य राखले पाहिजे. उपाध्यक्ष यांच्या दालनात जो प्रकार घडला, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही" अशा तीव्र शब्दात या घटनेचा निषेध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. सविस्तर वृत्त -
Top 10 @ 7 AM : सकाळी सातवाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - top 10 @7 am
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना, पाऊस यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 7 AM