- नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमातून भारतवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना, भारतीय कृषी कोष, पोषण महिना, लॉकडाऊन, भारतीय खेळ आदी विषयांवर भाष्य केलं. याआधी त्यांनी 18 ऑगस्टला या कार्यक्रमासंदर्भात नागरिकांकडून काही सूचना , कल्पना मागविल्या होत्या. पंतप्रधान मोदींचा आज मन की बात हा 68 वा कार्यक्रम आहे.
सविस्तर वाचा- मन की बात : सप्टेंबर 'पोषण महिना' म्हणून होणार साजरा...
- मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. शुक्रवार आणि शनिवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सुमारे १७ तास चौकशी करण्यात आली. आज रविवारी रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी हे तिघेही सीबीआयसमोर हजर झाले असून गेल्या तीन तासाहून अधिक काळ त्यांची चौकशी केली जात आहे.
सविस्तर वाचा- सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी मागील तीन तासांपासून चौकशी सुरू
- मुंबई -धारावीचा कायापालट करण्यासाठी 2004मध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र, 16 वर्षे झाली तरी हा प्रकल्प मार्गी लागत नसल्याने धारावीकर आता संतप्त झाले आहेत. सरकारच्या उदासीन भूमिकेमुळेच पुनर्विकास होत नसल्याचे म्हणत धारावीकरांनी सरकारविरोधात उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वाचा- पुनर्विकास प्रकल्पासाठी धारावीकर एकवटले; आता लढणार दुहेरी लढाई
- जळगाव - विरोधी पक्षनेता म्हणून स्वतःचे अस्तित्त्व दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची धडपड सुरू आहे. त्यामुळे ते काहीही निर्थरक वक्तव्य करत आहेत, अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. रविवारी दुपारी जळगावातील अजिंठा विश्रामगृहात मंत्री गुलाबराव पाटील 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते.
सविस्तर वाचा- स्वतःचे अस्तित्त्व दाखवण्यासाठी फडणवीसांची धडपड - गुलाबराव पाटील
- बुलडाणा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात राज्याच्या मंत्रिमंडळातील एक मोठा मंत्री सहभागी असून लवकरच तपासातून ते निष्पन्न होईल, असे म्हणत खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. यावर कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी प्रतिक्रिया देताना, कोणी सुर्याकडे तोंड करून थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी स्वत:च्या चेहऱ्यावर येत असते, असे म्हणत त्यांना फटकारले आहे.
सविस्तर वाचा- नारायण राणे आणि राम कदमांच्या 'त्या' वक्तव्यांना कृषिमंत्र्यांनी दिले उत्तर, म्हणाले..
- सोलापूर - शहरातील नई जिंदगी परिसरातील विष्णुनगर येथे एक व्यक्ती अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू विक्री करत असून नई जिंदगी परिसरात गोडावूनमध्ये गावठी दारूचा मोठा साठा केला असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. यावरुन गुन्हे शाखेच्या पोलिसानी शनिवारी कारवाई करत आकाश लक्ष्मण दिंडोरे याला अटक करून जवळपास 2 लाख रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे.
सविस्तर वाचा- नई जिंदगी परिसरातील 4 हजार 260 लिटर गावठी दारू जप्त, एकास अटक
- मुंबई - सुशांतसिंह राजपूत आर्थिक व्यवहार प्रकरणी तपास करणाऱ्या 'ईडी'कडून गौरव आर्या याला चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आला आहे. यानंतर गौरव आर्या हा रविवारी मुंबईत दाखल होत आहे. यासोबतच सीबीआयकडून सुशांतसिंह राजपूत याची बहीण मीतूसिंह हिला सुद्धा चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले आहे. यामुळे सोमवारी सकाळी 11 वाजता मीतूसिंह ही सीबीआय पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे.
सविस्तर वाचा- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी 'ईडी' करणार गौरव आर्याची चौकशी
- पुडुचेरी - केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी येथील आरोग्य मंत्र्याचे सध्या सर्व स्तरातून विशेष कौतूक केले जात आहे. याला कारणही तसेच खास आहे. रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्य मंत्र्यांनी शौचालयाची साफसफाई केली आहे. त्यांची ही कृती इतर राज्यातील राजकारणी मंडळीसाठी आदर्श निर्माण करणारी आहे.
सविस्तर वाचा- आरोग्य मंत्र्यांनी स्वच्छ केलं कोविड रुग्णालयातील शौचालय
- वॉशिंग्टन - अमेरिकेत भडकाऊ पोस्ट न हटवल्याबद्दल फेसबुकवर आरोप झाले आहेत. फेसबुककडून ही चूक झाल्याचे कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी मान्य केले आहे. मात्र, ही तांत्रिक चूक असल्याचे सांगत या प्रकरणी झुकेरबर्ग यांनी माफी मागितलेली नाही. जेकब ब्लेक याला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केल्यानंतर येथे हिंसक निदर्शने उसळली होती. यादरम्यान येथील एका सशस्त्र गटाने नागरिकांना शस्त्रे घेऊन केनोशा, विस्कॉन्सिन शहरात दाखल होण्याचे आवाहन फेसबुक पेजवरून केले होते. ही पोस्ट फेसबुकने न हटवल्याबद्दल त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
सविस्तर वाचा- झुकेरबर्ग यांनी फेसबुकने भडकाऊ पोस्ट न हटवल्याची चूक अखेर केली मान्य
- दुबई - आयपीएलच्या नव्या हंगामासाठी यूएईत दाखल झालेल्या विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत सरावाला सुरूवात केली आहे. कोरोनामुळे तब्बल पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर विराटने नेट्समध्ये सरावाला सुरूवात केली. मोठ्या ब्रेकनंतर पहिला फटका खेळताना 'मी घाबरलो' असल्याची कबुली विराटने यावेळी दिली. मात्र, सरावसत्र अपेक्षेपेक्षा चांगले झाल्याचेही त्याने सांगितले.
सविस्तर वाचा- मी घाबरलो होतो - विराट कोहली