ETV Bharat / state

मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडेना, मुख्यमंत्री पुन्हा दिल्ली दरबारी - bjp

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि भाजप प्रदेशाध्यक्षांची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मुख्यमंत्र्यांना यासाठी मुहूर्तच सापडेना अशी स्तिथी निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री घेणार अमित शाह यांची भेट
author img

By

Published : Jun 14, 2019, 4:20 PM IST

मुंबई - पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि भाजप प्रदेशाध्यक्षांची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मुख्यमंत्र्यांना यासाठी मुहूर्तच सापडेना अशी स्तिथी निर्माण झाली आहे. यासंदर्भात चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्ली वारी करणार असल्याची माहिती मिळते आहे.

केंद्रीय नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्या (शनिवारी) दिल्लीला जाणार आहेत. या बैठकीनंतर पुन्हा भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त सापडेना

मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप आणि सेनेतही आनंदाचे वातावरण नाही. मंत्रिमंडळातील संभाव्य नावालाही दोन्ही पक्षातून विरोध करण्यात येत आहे. तसेच शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची चर्चा बळावल्यानंतरही पक्षात धुसफूस सुरु झाली आहे. यामुळे विस्तार रखडला असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सत्ताधारी पक्षात कोणताही वाद नसल्याचे सांगितले असले तरी विस्ताराच्या कोणत्याही हालचाली अद्याप नाहीत. मात्र, दिल्लीत अमित शाह यांनी मान्यता दिल्यास १६ जूनचा मुहूर्त विस्ताराला सापडू शकतो अशीही चर्चा आहे.

रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली असून, त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची कार्यकाळ संपला असल्याने नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शोधात भाजप आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा विचार होता. मात्र, पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष नेमण्याची कसरत भाजपला करावी लागत असून, या पदासाठी उपाध्यक्ष सुरजसिंह ठाकूर, सुरेश हाळवणकर आणि संजय कुटे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, अमित शाह यांच्या भेटी नंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

Intro:मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडेना, प्रदेशाध्यक्ष ही मिळेना ,
मुख्यमंत्री पुन्हा दिल्ली दरबारी

मुंबई १४

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मंत्रिमंडळ विस्तार आणि प्रदेशाध्यक्षांची निवड करण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती . मात्र मुख्यमंत्र्यांना यासाठी मुहूर्तच सापडेना अशी स्तिथी निर्माण झाली आहे . आता पुन्हा मुख्यमंत्री दिल्ली दरबारी जाऊन या विषयांवर चर्चा करणार आहेत . केंद्रीय नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाणार असून या बैठकींनंतर पुन्हा भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे .

मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप आणि सेनेतही आनंदाचे वातावरण नाही . मंत्रिमंडळातील संभाव्य नावालाही दोन्ही पक्षातून विरोध करण्यात येत आहे .तसेच शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची चर्चा बळावल्या नंतरही पक्षात धुसफूस सुरु झाली आहे . यामुळे विस्तार रखडला असल्याचे बोलले जात आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सत्ताधारी पक्षात कोणताही वाद नसल्याचे सांगितले असले तरी विस्ताराच्या कोणत्याही हालचाली अद्याप नाहीत .मात्र दिल्लीत अमित शहा यांनी मान्यता दिल्यास १६ जूनचा मुहूर्त विस्ताराला सापडू शकतो अशीही चर्चा आहे .

दरम्यान रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली असून त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची कार्यकाळी संपला असल्याने नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शोधात भाजप आहे . महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा विचार होता . मात्र पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे .ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष नेमण्याची कसरत भाजपाला करावी लागत असून या पदासाठी उपाध्यक्ष सुरजसिंह ठाकूर , सुरेश हाळवणकर आणि संजय कुटे यांच्या नावाची चर्चा आहे . मात्र अमित शहा यांच्या भेटी नंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहेBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.