ETV Bharat / state

शिक्षकांच्या प्रश्नांवर उद्या भाजपा शिक्षक आघाडी मैदानात; राज्यभर करणार आंदोलने

राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असून शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीच्या वतीने सोमवारी (दि. 6 सप्टेंबर) राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.

म
author img

By

Published : Sep 5, 2021, 5:08 PM IST

मुंबई - राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असून शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीच्या वतीने सोमवारी (दि. 6 सप्टेंबर) राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.

विविध मागण्यासाठी आंदोलन

भाजपा शिक्षक आघाडीच्या प्रदेश संयोजक डॉ. कल्पना पांडे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच झालेल्या भाजपा शिक्षक आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये हे आंदोलन करण्यात येणार असून शिक्षणाधिकारी, विभाग शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देण्यात येणार आहेत. महाविकास आघाडीने शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रश्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले असून शिक्षकांना वेळेवर 1 तारखेला वेतन मिळत नाही ते वेळेवर मिळावे, वरिष्ठ व निवडश्रेणी पासून हजारो शिक्षक वंचित असून शिक्षकांचे प्रशिक्षण तातडीने आयोजित करणे, पीएफ, मेडिकल बिले त्वरित मंजूर करावी, शिक्षण सेवकांची 7 व्या वेतन आयोगप्रमाणे वाढ करण्यात यावी, जुनी पेंशन योजना, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके त्वरित देण्यात यावीत. ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. शिक्षक भरती सुरू करण्यात यावी यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.

शिक्षण क्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली घोषणा अजूनही हवेतच आहे. याबाबत कोणतीही कार्यवाही सरकारने केलेली नाही. महाविकास आघाडीने शिक्षणक्षेत्राकडे संपूर्ण दुर्लक्ष केले असल्याची टीका भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे.

हेही वाचा - तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन सज्ज - सीताराम कुंटे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.