- मुंबई - शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात, राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून निघालेले शेतकरी आंदोलक काल (रविवार) मुंबईत दाखल झाले. आझाद मैदानात आज होणाऱ्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी सहभागी होणार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्याच्या २१ जिल्ह्यामधून शेतकरी व कामगार हे नाशिकहून मुंबईत दाखल झाले. याबाबत आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्याशी बातचीत केली. पाहा काय म्हणाले नवले...
सविस्तर वाचा - शेतकऱ्यांचा 'विराट' मोर्चा : डॉ. नवले यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित
- नवी दिल्ली - अडीच महिन्याच्या काळानंतर पुन्हा एकदा एलएसीवरचा तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात रविवारी चर्चा झाली. ही चर्चा चीनच्या हद्दीतील माल्डो या भागात झाली असून भारताकडून लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी नेतृत्व केले. यात एलएसी सीमारेषेवर मे महिन्यात जशी परिस्थिती होती, तशी परिस्थिती निर्माण करण्यात यावी आणि चीनी सैनिकांनी माघार घ्यावी, असे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मे महिन्यानंतर भारत-चीन सीमारेषेवर तणाव वाढला. यानंतर दोन्ही देशांचे ५०-५० हजार सैनिक लडाखमध्ये तैनात करण्यात आले. या तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोन देशांदरम्यान नववी बैठक पार पडली आहे.
सविस्तर वाचा - भारत-चीन सीमावाद : अडीच महिन्यानंतर पुन्हा चर्चा; काय घडलं वाचा
- अमरावती - मागील 55 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांचे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. मागील 55 दिवसांपासून त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. आता अपेक्षा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करतील. पण तसे झाले नाही कारण पंतप्रधान मोदींचा हेखेखोरपणा आडवा आला आहे, अशी जहरी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
सविस्तर वाचा - 'कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदींचा हेखेखोरपणा आडवा आला'
- पुणे (बारामती) - येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण महिला रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती नगरपालिका, प्रशासकीय भवन, तसेच शहरातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेल्या चार खासगी रुग्णालयांचे अनेक दिवसांपासून फायर ऑडिटच झालेले नाही. तर अनेक ठिकाणी आग विझवण्यासाठी लावण्यात आलेल्या सिलेंडरची मुदत संपलेली आहे. तसेच फायर फायटिंग बॉक्सची दुरवस्था झाली असून ते केवळ शोभे पुरतेच असल्याचे दिसून आले.
सविस्तर वाचा - बारामतीतील खासगी व शासकीय कार्यालये, दवाखान्यांची फायर फायटिंग यंत्रणा रामभरोसे
- श्रीनगर - मंगळवारी साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर आणि काश्मीरमधील इतर ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काश्मीर खोऱ्यात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सविस्तर वाचा - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेत वाढ
- नागपूर - राज्यातील पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना घरे देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली ती पाहाता राज्य सरकार घरे बांधू शकणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरुन प्रसंगी खासगी विकासकांची मदत घेऊन राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जातील, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
सविस्तर वाचा - राज्यात पोलिसांसाठी एक लाख नवी घरे बांधणार - गृहमंत्री अनिल देशमुख
- मुंबई - रविवार २४ जानेवारीला बॉलिवूड अभिनेता वरुण धवन बोहल्यावर चढला. त्याचे त्याची बऱ्याच वर्षांची गर्लफ्रेंड नताशा दलाल सोबत शुभमंगल झाले. खरंतर त्याला अनुष्का-विराट, रणवीर-दीपिका प्रमाणे परदेशात लग्नसोहळा भरवायचा होता व त्यादृष्टीने तयारीही सुरु होती, परंतु गेल्या वर्षी आलेल्या कोरोना महामारीमुळे त्या सर्वावर पाणी फेरले गेले. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही त्यामुळे ‘अजून किती थांबायचं’ आसा विचार करत त्याने अलिबाग येथील एका आलिशान रिसॉर्टमध्ये लग्न केले.
सविस्तर वाचा - मनोरंजनसृष्टीत लॉकडाऊननंतर लगीनघाई.. 'हे' सेलेब्रिटी चढले बोहल्यावर
- मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांचा महामोर्चा मुंबईत धडकला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान मोर्चानं हे आंदोलन पुकारलं आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात नाशिकहुन मुंबईला पोहचला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत.
सविस्तर वाचा - शेतकऱ्यांचे 'लाल वादळ' मुंबईत धडकले!
- बुलडाणा - आज सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भरधाव कंटेनरने काळी पिवळी गाडीला धडक दिल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा-वडनेर मार्गावरील वडी येथे भीषण अपघातात घडला. या अपघातात पती-पत्नीसह तिघे जण ठार झाले असून नऊ जण जखमी झाले आहे.
सविस्तर वाचा - बुलडाण्याच्या नांदुरा-वडनेर मार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
- मुंबई - दिंडोशीत क्रिकेटचा राजकीय डाव रंगल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी आमदार सुनील प्रभूंच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत उपस्थित खेळाडूंचा उत्साह वाढवला तसेच त्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. दिंडोशी विधानसभा क्षेत्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमत्त अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा ‘आमदार चषक 2021’ येथे आयोजन करण्यात आलं. दिंडोशीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला उर्मिला मातोंडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
सविस्तर वाचा - VIDEO : आमदार सुनील प्रभूंच्या गोलंदाजीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांची फटकेबाजी!
- गाझियाबाद - शेतकर्यांच्या ट्रॅक्टरला पेट्रोल पंपावर डिझेल दिले नाही. तर पेट्रोल पंप बाहेर ट्रॅक्टर जाम केला जाईल, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरना डिझेल नाकारला जात असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला.
सविस्तर वाचा - '...तर पेट्रोल पंप बाहेर ट्रॅक्टर जाम केला जाईल'; टिकैत यांचा इशारा