ETV Bharat / state

Top १० @ ११ PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - top ten news of maharashtra

राज्यासह देश आणि विदेशातील महत्वाच्या १० घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Top १० @ ५ PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...
Top १० @ ७ PM : रात्री नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...
author img

By

Published : Jul 2, 2020, 1:04 PM IST

Updated : Jul 2, 2020, 10:45 PM IST

मुंबई - माळशिरसमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू...शेतात कामासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा तळ्यात बुडून मृत्यू... यासह महत्वाच्या घटना वाचा एका क्लिकवर...

माळशिरस (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील तंरगफळ गावात आज (गुरुवार) सकाळी गॅस गळतीनंतर सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये आई आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आई सोनल ज्ञानेश्वर शिंदे (३०) आणि सावळा (७) कृष्णा (५) अशी मृत्यू पावलेल्या आई व मुलांची नावे आहेत.

वाचा सविस्तर - माळशिरसमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नागपूर - कामाला गेलेल्या चिमुकल्या मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना कोंढाळी जळील घुबडी शिवारात घडली आहे. भाग्यश्री येडमे आणि अर्चिता मंगाम असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.

वाचा सविस्तर - धक्कादायक; शेतात कामासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा तळ्यात बुडून मृत्यू

नवी दिल्ली - निमलष्करी दलात 'ट्रान्सजेंडर' म्हणजेच तृतीयपंथीयांची भरती करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय गंभीरपणे विचार करत असून विविध निमलष्करी दलांकडे सूचना मागविल्या आहेत. निमलष्करी दलात 'असिस्टंट कमांडंट' पदावर तृतीयपंथीयांची भरती करण्याचा विचार गृहमंत्रालय करत आहे.

वाचा सविस्तर - निमलष्करी दलात तृतीयपंथीयांच्या भरतीबाबत गृहमंत्रालयाने मागितल्या सूचना

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. मंत्रालयाच्या नव्या नियमानुसार आता, खासगी डॉक्टरांनाही एखाद्या रुग्णाला कोरोना चाचणीसाठी पाठवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांवर भर देण्याचा केंद्राचा निर्णय खऱ्या अर्थाने लागू होण्यासाठी मदत होणार आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांसोबत झालेल्या एका बैठकीनंतर केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

वाचा सविस्तर - आता खासगी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरही करता येणार कोरोना चाचणी; आरोग्य मंत्रालयाचा निर्णय

मुंबई - कोरोना विषाणूचे मुंबईत गुरूवार (दि. 2 जुलै) नवे 1 हजार 554 रुग्ण आढळून आले असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 80 हजार 262 वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा 4 हजार 686 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 5 हजार 903 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 50 हजार 694 वर पोहचला आहे. मुंबईत सध्या 24 हजार 882 सक्रिय रुग्णांवर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 63 टक्क्यांवर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

वाचा सविस्तर - मुंबईत 1 हजार 554 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, 57 मृत्यू

बुलडाणा - नोकरी लावून देतो म्हणून बुलडाणा ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीला चुलत काका-काकूने पळवून नेत पुण्यात वेश्या व्यवसाय करायला लावल्याची धक्कादायक माहिती बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याचा केलेल्या उलगड्यातून समोर आली आहे. पोलिसांनी सापळा रचून पुण्यातील मांजरी खुर्द येथील यशराज हॉटेल येथून चुलत काका, चुलत काकू व हॉटेल मालक देवराव उंदरे ताब्यात घेवून त्यांच्या तावडीत असलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.

वाचा सविस्तर - नोकरीच्या आमिषाने काका-काकूने पुतणीला पुण्यात नेले अन् वेश्या व्यवसायात ढकलले

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. रेल्वेचे खासगीकरण करून सरकार गरीबांची जीवनरेषा (लाईफलाईन) त्यांच्यापासून हिसकावून घेतेय, जनता सरकारच्या या निर्णयाला उत्तर देईल, असे राहुल गांधी म्हणाले.

वाचा सविस्तर - "रेल्वेच्या खासगीकरणातून सरकार गरीबांची 'लाईफलाईन' हिसकावून घेतंय"

नवी दिल्ली – चीनबरोबर तणावाची स्थिती असताना केंद्र सरकारने शस्त्रास्त्रे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (डीएसी) बैठक झाली. या बैठकीत शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी सुमारे 38 हजार 900 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

वाचा सविस्तर - संरक्षण मंत्रालयाकडून मिगसह 38 हजार 900 कोटींच्या शस्त्रास्त्रे खरेदीला मंजुरी

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते लोकार्पण झालेले एमएमआरडीएने बांधलेले फेज 2 मधील कोविड रुग्णालय अद्याप पालिकेला हस्तांतरण झाले नसल्याचे समोर आले आहे. तसेच या रुग्णालयाला अजून मेडिकल स्टाफच उपलब्ध झाला नसून तशा मागणीचे पत्र देखील संबंधित प्रशासनाला लिहिण्यात आले आहे.

वाचा सविस्तर - मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेले बिकेसीतील कोविड रुग्णालयाचे पालिकेला हस्तांतरण नाहीच

जळगाव - सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात आज सोन्याच्या दराने उच्चांक गाठला. आज सकाळी सराफ बाजार सुरू झाला तेव्हा प्रति तोळा(10 ग्रॅम) 51 हजार 500 रुपये इतका दर सोन्याला मिळाला. येत्या आठवडाभरात सोन्याचे 53 हजार रुपये प्रति तोळा असतील, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तवला आहे. जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे सोने-चांदीचे भाव वाढत आहेत.

वाचा सविस्तर - सुवर्णनगरी जळगावात सोन्याचा नवा उच्चांक, 51 हजार 500 रुपये प्रतितोळा

Last Updated : Jul 2, 2020, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.