ETV Bharat / state

Top १० @ ११ AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

सकाळी ११ वाजेपर्यंतच्या देश, राज्यभरातील महत्वाच्या १० बातम्या वाचा एका क्लिकवर

सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

author img

By

Published : Jul 1, 2020, 11:06 AM IST

मुंबई - जम्मू काश्मीरमध्ये दहशवाद्यांच्या गोळीबारात सीआरपीएफच्या एका जवानास वीरमरण आले आहे... राज्यात महाविकास आघाडीने आता मराठी भाषा सक्तीकरण शासकीय कार्यालयात लागू केले आहे.. पवईतील हिरानंदानी गार्डनमधल्या डेल्फि इमारतीला आग लागली होती.. यासारख्या महत्वाच्या १० बातम्या वाचा एका क्लिकवर

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या सोपोरामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात एका जवानाला वीरमरण आले आहे. तर अन्य २ जवान गंभीर जखमी झाले आहेत. तसेच १ स्थानिक नागरिकही या हल्ल्यात जखमी झाला आहे.

वाचा सविस्तर - जम्मू-काश्मीरच्या सोपोरामध्ये दहशतवादी हल्ला; सीआरपीएफ एका जवानास वीरमरण, एक गंभीर

मुंबई- मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी शासन पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी बंधनकारक केल्यानंतर शासकीय कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर इतर कारवाईसोबतच त्यांची वेतनवाढ एक वर्षासाठी रोखण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मराठी भाषा विभागाने सोमवारी या संदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.

वाचा सविस्तर -राज्य सरकारचा 'मराठी बाणा' ...मराठीत कामकाज केले नाही तर शासकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत रोज हजार ते दीड हजार रुग्णांची रोज भर पडत आहे. मुंबईत आणखी 903 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 77 हजार 197 वर पोहचली आहे. तर 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 4 हजार 554 वर गेला आहे. आतापार्यंत 44 हजार 170 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 28 हजार 473 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 57 टक्क्यांवर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

वाचा सविस्तर - कोरोनाचा विळखा घट्ट ; मुंबईत नवे 903 कोरोनाबाधित आढळले

मुंबई - पवई हिरानंदानी गार्डन येथील डेल्फि इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका कार्यालयाला आज पहाटे आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवले असून कोणीही जखमी झालेले नाही. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

वाचा सविस्तर -पवईत हिरानंदानी गार्डनमधील इमारतीला आग, जीवितहानी नाही

कोल्हापुर - कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी मानवी प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून महाराष्ट्रातील पाच कोटी जनतेला आर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक औषधे मोफत देणार असल्याची माहिती, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिली. शिवाय औषधे खरेदीचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदांना असल्याचेही त्यांनी म्हटलं. आज सायंकाळी उशिरा मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

वाचा सविस्तर - 'प्रतिकार शक्ती वाढण्यासाठीचे औषध ५ कोटी ग्रामीण जनतेला मोफत'

मुंबई - राज्य शासनाच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याप्रमाणेच केंद्रीय संस्थाच्या कर्मचाऱ्यांना लाेकल प्रवासासाठी 1 जुलैपासून परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेने देखील आपल्या लाेकलच्या फेऱ्यांची संख्या वाढविली आहे. मध्य रेल्वेवर 150 व पश्चिम रेल्वेवर 148 जादा फेऱ्यांची भर पडली आहे. एकूणच दिवसभरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 700 फेऱ्या मध्य व पश्चिम मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

वाचा सविस्तर -केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचा लाेकल प्रवास सुरु; दोन्ही रेल्वे मार्गावर 700 फेऱ्या होणार

परभणी - गंगाखेड येथील संत जनाबाई व संत मोतीराम महाराज यांच्या 'हेलिकॉप्टरवारी'ची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही संतांची वारी यंदा रद्द झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त व सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारची परवानगी देऊ नये, असे कळविल्यानंतर परभणीच्या जिल्हा प्रशासनाने देखील या 'हेलिकॉप्टरवारी'ची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदा सावळ्या विठ्ठलाच्या भेटीला जनाबाईची पालखी आज पंढरपूरला जाऊ शकली नाही. यावर मात्र वारकरी संप्रदायाकडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर -संत जनाबाईंच्या पालखी सोहळ्याला परवानगी नाकारली; वारकरी संप्रदायाकडून प्रशासनाचा निषेध

जळगाव- राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या धरणगाव तालुक्यात दुषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. धरणगाव तालुक्यातील सतखेडे गावात दुषित पाण्यामुळे ४० ग्रामस्थांना बाधा झाली आहे. अस्वस्थ ग्रामस्थांवर जिल्हा परिषदेच्या शाळेत उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत ग्रामसेवक नामदेव दगडू शिंपी यांना निलंबित करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर - स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघातच ४० जणांना दुषित पाण्याची बाधा !

नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर तणाव असून चर्चेद्वारे वाद मिटविण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी चुशूल येथे भारतीय आणि चिनी सैन्याच्या दरम्यान कमांडर पातळीवर बैठक पार पडली. ही बैठक तब्बल 12 तास सुरू होती, अशी माहिती आहे. लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी भारतीय सैन्याचं नेतृत्व केलं. तर चीनच्या वतीने मेजर जनरल लियू लिन हे होते.

वाचा सविस्तर - भारत-चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा, 12 तास चालली बैठक

जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील श्री संत मुक्ताबाई संस्थान मंदिर आषाढी एकादशीला प्रथमच बंद राहणार आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला याठिकाणी दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविकांची मोठी उसळते. परंतु, यावर्षी मुक्ताई मंदिराचा परिसर वैष्णवांच्या मांदियाळीविनाच राहणार आहे.

वाचा सविस्तर - कोथळीचे मुक्ताई मंदिर आषाढीला प्रथमच बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.