मुंबई - शिवसेना आणि कंगना रणौतचा वाद शमण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. बुधवारी कंगना मुंबईत दाखल होण्यापूर्वी बीएमसीने कारवाई करत तिचे घराचे अनधिकृत बांधकाम पाडले. त्यानंतर बेताल वक्तव्य करणाऱ्या कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी करत शिवसेनेला बाबरसेनेची उपमा दिली होती. मात्र, ती तेवढ्यावरच थांबली नसून कंगनाने आज शिवसेनेला थेट सोनिया सेना म्हणत पुन्हा टीका केली आहे. यावर आता शिवसेनेकडूनही कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
वाचा सविस्तर - सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार विकून शिवसेना आता 'सोनिया सेना' झालीय - कंगना
मुंबई - कंगनाच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामाच्या कारणावरून मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवल्यानंतर संतप्त झालेल्या कंगनाने वाटेल तसा निशाणा साधत शिवसेनेला बाबरची सेना देखील म्हटलं. कंगनाच्या या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कारवाईमागे कोणतीही बदल्याची भावना नाही ”बाबरी तोडणारे लोक आम्हीच आहोत. त्यामुळे बाबर आणि बाबरी बद्दल तिने न बोललेच बरे असे चोख प्रत्युत्तर दिले आहे.
वाचा सविस्तर - बाबरी पाडणारे आम्हीच आहोत’; कंगनाच्या ‘बाबर सेना’ टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर
मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेतील वाद आता आणखी नवे वळण घेण्याचे संकेत देत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता यांना निमंत्रीत करून कंगना प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाला खतपाणी मिळण्याची चिन्ह आहेत.
वाचा सविस्तर -कंगनाचा वाद 'राजभवना'च्या अंगणात...राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांना केले पाचारण
नवी दिल्ली - दिवसेंदिवस देशातील कोरोनाचा उद्रेक वाढत असून मागील चोवीस तासांत 95 हजार 735 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच एक हजार 172 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशभरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 44 लाख 65 हजार 864 झाली आहे. यामधील 9 लाख 19 हजार १८ अॅक्टिव्ह केसेस आहेत.
वाचा सविस्तर -देशात कोरोनाचा उद्रेक, 44 लाखांचा टप्पा पार, मागील चोवीस तासांत 95 हजार 735 'पॉझिटिव्ह'
मुंबई - कुठलीही योजना कागदावर चांगलीच असते. तिचा उद्देशही चांगलाच असतो. प्रश्न असतो तो पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणीचा. त्यात जेव्हा गडबड होते तेव्हा त्यावरून केलेली बडबड ‘पोकळ’ आणि खर्च ‘वायफळ’ ठरतो. जलयुक्त शिवार योजनेचे तेच झाले. ‘कॅग’ने मारलेल्या ताशेऱ्यांचा तोच अर्थ आहे. अंमलबजावणी प्रभावी झाली असती तर राज्यातील शिवारे खऱ्या अर्थाने ‘जलयुक्त’ झाली असती, असा टोला शिवसेनेने मुखपत्र सामनामधून तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला आहे.
वाचा सविस्तर -पोकळ आणि वायफळ बडबडीने ‘जलयुक्त’चा फुगा फुटला!
नवी दिल्ली - बहुप्रतिक्षीत लढाऊ विमान राफेलचा आज औपचारिकरित्या भारतीय हवाईदलात समावेश झाला आहे. चंदिगडच्या अंबाला हवाईतळावर हा सोहळा संपन्न झाला आहे. राफेलचा समावेश भारतीय हवाईदलातील 17 स्क्वाड्रनमध्ये होणार आहे. त्याला गोल्डन अॅरो नावाने संबोधण्यात येणार आहे.
वाचा सविस्तर - राफेलचा आज हवाईदलात अधिकृतपणे समावेश, अंबाला हवाईतळावर कार्यक्रम संपन्न
शिमला - महाराष्ट्रातील राजकारणाचे पडसाद हिमाचलप्रदेशमध्येही उमटले आहेत. राज्य सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध हिमाचल भाजपाकडून नोंदवण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारचा विरोध करत हिमाचल भाजपा कार्यकारिणी आज रस्त्यावर उतरणार आहे. याबाबत प्रदेश भाजपाने अधिकृत व्हिप काढले असून ब्लॉक स्तरावर हे आंदोलन पार पडणार आहे.
वाचा सविस्तर - कंगना प्रकरणाचे पडसाद हिमाचलमध्ये...प्रदेश भाजपाचे महाराष्ट्र सरकारविरोधात आंदोलन
मुंबई - दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन, राज्यातील कोरोनाची भयावह स्थिती आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून अभिनेत्री कंगना रणौतच्या आडून शिवसेनेवर केले जात असलेले राजकीय हल्ले याविषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची वर्षा निवासस्थानी सायंकाळी एक खास बैठक पार पडली.
वाचा सविस्तर - मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत राजकीय खलबते; कंगना संदर्भात सावध भूमिका घेण्याची पवारांची सूचना
मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात उडी घेऊन व मुंबईवर वादग्रस्त व्यक्तव्य केल्यानंतर वादात सापडलेली अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असे चित्र सध्या तयार झाले आहे. मुंबई महापालिकेकडून कंगनाचे पाली हिल स्थित कार्यालय तोडण्यात आल्यानंतर तीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिग्दर्शक करण जोहरवर टीका केली आहे.
वाचा सविस्तर - 'मी जगेल किंवा मरेन, मात्र, तुमचं पितळ उघडं पाडणारच'
मुंबई - सिने अभिनेत्री कंगना रणौतच्या वांद्रे पाली हिल येथील "मणीकर्णिका" या कार्यालयावर पालिकेने कारवाई केली होती. यानंतर आता कंगनाच्या खार येथील घरामधील अनधिकृत बांधकामाबाबत कोर्टाने दिलेला स्टे उचलण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. हा स्टे उचलल्यास कंगनाच्या खार येथील घरावरही तोडक कारवाई होऊ शकते.
वाचा सविस्तर -कंगनाच्या खार येथील घरावरही चालणार हातोडा; कोर्टातील स्टे हटवण्याचा पालिकेचा प्रयत्न