ETV Bharat / state

आज राज्यात ३,५७९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान, तर ७० रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज ३,५७९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,८१,६२३ वर पोहचला आहे. तर सद्यस्थितीत ५२,५५८ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

todays corona patient numbers in maharashtra
आज राज्यात ३,५७९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान तर ७० रुग्णांचा मृत्यू
author img

By

Published : Jan 14, 2021, 8:43 PM IST

मुंबई - आज राज्यात ३,५७९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,८१,६२३ वर पोहचला आहे. राज्यात आज ७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५०,२९१ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ५२,५५८ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के -

राज्यात आज ३,३०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १८,७७,५८८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३६,२३,२९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८१,६२३ नमुने म्हणजेच १४.५५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, राज्यात १,९६,८२९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ५२,५५८ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

हेही वाचा - धनंजय मुंडेंवर बलात्काराची तक्रार करणारी महिला पोलीस ठाण्यात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.