मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी 3 हजार 608 रुग्ण आढळून आले होते. शुक्रवारी त्यात किंचित घट होऊन 3 हजार 286 रुग्ण आढळून आले आहेत. 51 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 3 हजार 933 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- 38,491 सक्रिय रुग्ण -
शुक्रवारी राज्यात 3286 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 37 हजार 843 वर पोहचला आहे. तर शुक्रवारी 51 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 38 हजार 776 वर पोहचला आहे. शुक्रवारी 3 हजार 933 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 63 लाख 57 हजार 012 वर पोहचला आहे.
हेही वाचा - पुन्हा घंटा वाजणार.. राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून होणार सुरू, मात्र.. शिक्षणमंत्र्यांनी सांगितली नियमावली
- रुग्ण बरे होण्याचा दर 97.23 टक्के -
रुग्ण बरे होण्याचा दर 97.23 टक्के, तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 78 लाख 19 हजार 385 नमुन्यांपैकी 65 लाख 37 हजार 843 नमुने म्हणजेच 11.31 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 58 हजार 653 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 38 हजार 491 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
- रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 075, 20 सप्टेंबरला 2 हजार 583, 21 सप्टेंबरला 3 हजार 131, 22 सप्टेंबरला 3 हजार 608, 23 सप्टेंबरला 3 हजार 286 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 2 सप्टेंबरला 55, 6 सप्टेंबरला 37, 20 सप्टेंबरला 28, 21 सप्टेंबरला 70, 22 सप्टेंबरला 48, 23 सप्टेंबरला 51 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - Guidelines for Schools : शाळा सुरू झाल्यानंतर 'या' नियमांचं करावं लागेल पालन
- या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 446
अहमदनगर - 691
पुणे - 399
पुणे पालिका - 141
पिंपरी चिंचवड पालिका - 100
सोलापूर- 245
सातारा - 176
सांगली - 116