ETV Bharat / state

Today Cryptocurrency Price : क्रिप्टोकरन्सीच्या दरात वाढ, गुंतवणूक केल्यास होईल फायदा; जाणून घ्या आजचे दर

मागील दोन दिवसांच्या तुलनेत क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर हे वाढताना दिसले आहेत. 2009 मध्ये बिटकॉइन लाँच करण्यात आले. २०१५ मध्ये एथेरिअम तयार करण्यात आले. नव्या पिढीचा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूकीचा कल वाढला आहे. जाणून घेऊयात आजचे दर

Today Cryptocurrency Price
क्रिप्टोकरन्सीच्या दरात वाढ, गुंतवणूक केल्यास होईल फायदा
author img

By

Published : Feb 3, 2023, 7:08 AM IST

मुंबई : बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. त्याची किंमत सुमारे 439.77 दशलक्ष डॉलर होती. आज बीटकॉइनची किंमत 19,27,759.92 आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,34,469.86 रूपये आहे. बायनान्सची किंमत 27,047.72 रूपये आहे. गेल्या 24 तासांमध्ये बिटकॉइन, इथेरिअम, बायनान्सचा दर हा वाढला आहे.

Today Cryptocurrency Price
क्रिप्टोकरन्सीच्या दरात वाढ, गुंतवणूक केल्यास होईल फायदा

क्रिप्टोकरन्सीचे मागील काही दिवसांचे दर : क्रिप्टोकरन्सी ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो, त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. ही एक पीअर टू पीअर इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, ज्याद्वारे आपण इंटरनेटवरून नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष असते. काल म्हणजेच ( बुधवारी दि.1 ) बीटकॉइनची किंमत 18, 89,798 च्या आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,29,720 रूपये होती. तर बायनान्सची किंमत 25,720 रूपये होती. तर ( गुरूवारी दि.2 ) बीटकॉइनची हीच कींमत 19,23,818 च्या आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,33,386 रूपये होती. तर बायनान्सची किंमत 25,916 रूपये होती.

इथेरिअमचा इतिहास : एथेरिअमचा पुरवठा कोणत्याही सरकार किंवा कंपनीद्वारे नियंत्रित केला जातो. ते विकेंद्रित आहे. जगभरातील लोक एथेरिअमचा उपयोग पेमेंट करण्यासाठी करतात. २०१५ मध्ये एथेरिअम तयार करण्यात आले. एथेरिअम हे एक प्रकारचे क्रिप्टोकरन्सी आहे. जो ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित मुक्त स्रोत मंच आहे. इतर ब्लॉकचेन्स प्रमाणेच, एथेरिअमचे एथेर नावाचे मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. ईटीएच हे डिजिटल पैसे आहेत. जर बिटकॉइनबद्दल ऐकले तर एथेरिअममध्ये बर्‍याच वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे पूर्णपणे डिजिटल आहे. जगात कोणालाही त्वरित पाठवले जाऊ शकते.

रोलर कोस्टर राइड : 2009 मध्ये जेव्हा बिटकॉइन लाँच करण्यात आले तेव्हा त्याची किंमत 0.060 रुपये होती. म्हणजे 10 पैशांपेक्षा कमी आणि आज बिटकॉइनची किंमत 14 लाखांच्या आसपास आहे. एवढेच नाही तर ही क्रिप्टोकरन्सी ५० लाख रुपयांच्या आकड्याला स्पर्श करून परतली आहे. आता तुम्ही स्वतःच कल्पना करू शकता की रोलर कोस्टर राइड बिटकॉइनने या 14 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना किती दिला आहे. पुढील काळात व्यवहारांमध्ये, गुंतवणूकीत क्रिप्टोचलनाचा मोठा बोलबोला असण्याची शक्यता आहे.

व्यवहार गोपनीय : हे चलन भौतिक नसते. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. या चलनावर कोणत्याही देशाची किंवा कंपनीची मक्तेदारी नाही. आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी सशक्त क्रिप्टोग्राफी वापरते. केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात. हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या साहाय्याने निर्माण करण्यात आलेले चलन आहे.

हेही वाचा : Today Cryptocurrency Price: क्रिप्टोकरन्सी किमतीत 24 तासात 3.29 टक्क्यांची घसरण; जाणून घ्या आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.