ETV Bharat / state

Breaking - अँटिलिया स्फोटकं प्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल

breaking News
breaking News
author img

By

Published : Sep 3, 2021, 8:04 AM IST

Updated : Sep 3, 2021, 5:20 PM IST

17:16 September 03

अँटिलिया स्फोटकं प्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल

मुंबई -अँटिलिया स्फोटकं प्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींविरोधात यूएपीए कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विषेश एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मासह अन्य 8 जण एनआयएच्या ताब्यात आहेत.  

16:36 September 03

भावना गवळी भ्रष्टाचार आरोप प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीची टीम वाशिममध्ये दाखल

वाशिम - शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शंभर कोटीच्या घोटाळा प्रकरणी संस्थेच्या चौकशीसाठी ईडीची टीम वाशिम येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल झाली आहे. तीन तासापासून ईडीची टीम कार्यालयात चौकशी करत आहे. रिसोडनंतर दुसऱ्यांदा ईडीची टीम वाशिम जिल्ह्यात आली आहे.  

15:26 September 03

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा चौकशी समितीचा अंतिम अहवाल अद्याप बाकी

नागपूर - वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर चौकशी समिती गठित करण्यात आली होती. मात्र, या समितीने अहवाल अद्याप सादर केला नसल्याची माहिती वन विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी दिली आहे. समितीच्या अध्यक्षांनी या प्रकरणातील दोन्ही अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्याप अहवाल तयार झाला नसल्याचे सांगितले जात आहे.  

13:08 September 03

... तर ओबीसी समाज महाविकास आघाडीच्या नेत्यांना गावात फिरू देणार नाही - बावनकुळे

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत खुशाल 1000 बैठका घ्याव्यात. मात्र, उद्या होणार असलेल्या बैठकीत इंम्पेरिकल डेटा गोळा करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊन डिसेंबर महिन्यापर्यंत आरक्षण देण्याची घोषणा करावी. 4 मार्च 2021 ला सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने डेटा द्यावा. मात्र सरकार डेटाच तयार करणार नसेल तर बैठका घेऊन काहीच फायदा नाही. आरक्षण मिळालं नाही, तर ओबीसी समाज महाविकास आघाडीच्या नेत्यांना गावात फिरू देणार नाही' असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. ओबीसी मोर्चाने आज नागपुरात संविधान चौकात ओबीसी राजकीय आरक्षणासाठी आंदोलन केले. तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.

13:05 September 03

भिवंडीत घर कोसळून एकाचा मृत्यू

भिवंडी महानगरपालिकेच्या आझमीनगर झोपडपट्टीतील एक मजली घर कोसळले. यात एका पुरूषाचा मृत्यू झाला आहे. तर, 2 महिलासह 9 जण जखमी झाले आहेत. त्यांना भिवंडीच्या आयजीएम हाॅस्पीटलमध्ये दाखल केले आहे. घराचा धोकादायक भाग मनपाच्या वतीने काढण्याचे काम सुरू आहे.

12:52 September 03

वसई -

वसईच्या 'त्या' संशयीत बोटीची अखेर ओळख पटली

उत्तन समुद्रातून भरकटकेली बोट वसईत येऊन धडकली

बोटीत अडकलेल्या खलाशाचे हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन

२६ तास बोटीत अडकलेल्या खलाशांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

अखेर बोटमालक सापडल्याने पोलिसांचा जीव पडला भांड्यात

12:50 September 03

दागिण्यांचे आजचे दर

सोने : 48 हजार 800 रुपये प्रतितोळा जीएसटीसह

चांदी : 64 हजार 750 रुपये प्रतिकिलो जीएसटीसह

दोन्ही धातूंच्या दरात या आठवड्यात फार चढउतार नाही

10:50 September 03

नाशिक :-

प्रत्येक मंदिरात जर एक 'ठाकरे-पवार दानपेटी' बसवली तर मग मंदिरं उघडली जातील का? असा सवाल भाजपचे आचार्य तुषार भोसलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे. 'ज्या गोष्टीत आपल्याला वसुली करता येते, केवळ त्यांनाच सवलत द्यायची, हा ठाकरे सरकारचा मुख्य नियम आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिरात जर एक 'ठाकरे-पवार दानपेटी' बसवली तर मंदिरं उघडली जातील का? हा आमचा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे', असे आचार्य तुषार यांनी म्हटले आहे. 

10:47 September 03

बेळगाव पालिका निवडणुकीत छत्रपती शिवरांचा भगवा फडकणार, 30 ते 40 जागा जिंकणार - संजय राऊत

मुंबई - 'बेळगाव महानगर पालिका निवडणुकीत छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडाच फडकणार आहे. कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या केली आणि महापालिका बरखास्त केली. 8 वर्षानंतर निवडणूक होत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा आहे. 30 ते 40 आमचे उमेदवार निवडून येतील आणि त्या ठिकाणी भगवा फडकेल', अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली

10:46 September 03

शेअर बाजार- सेन्सेक्स ५८ हजारांच्या पार...

मुंबई - शेअर बाजारात आज सेन्सेक्स ५८ हजारांच्या पार... 

10:26 September 03

अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर आज 12 वाजता ब्रह्माकुमारी विधीनुसार होणार अंत्यसंस्कार

मुंबई - अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर आज 12 वाजता ब्रह्माकुमारी विधीनुसार होणार अंत्यसंस्कार

10:02 September 03

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या प्रवीण कुमारला उंच उडीत रौप्य पदक

टोकियोः टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लटलूट सुरूच आहे. त्यातच उंच उडीत भारताच्या प्रवीण कुमार याने रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. पुरुष उंच उडी टी ६४ प्रकारात प्रवीणने रौप्य पदक जिंकले आहे. दरम्यान, पॅरालिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत ११ पदकांची कमाई केली आहे.

09:56 September 03

ड्रग्ज कनेक्शन, रकुल प्रीत सिंह ईडी कार्यालयात दाखल

हैदराबाद : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ड्रग्ज कनेक्शना संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात पोहोचली आहे. ईडीने चार वर्षे जुन्या ड्रग्ज प्रकरणात टॉलीवुडचे टॉपचे अभिनेते, अभिनेत्री आणि डायरेक्टर्सना नोटीस पाठवली आहे. यामध्ये रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रव‍ि तेजा, पुरी जगन्नाथ यांचा समावेश आहे.

09:02 September 03

भाजप पदाधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार देणाऱ्या महिलेने फिनेल पिले, हातावर लिहिले...

औरंगाबाद : भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार देणाऱ्या महिलेने फिनेल पिले. 'मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला अशोक दामले जबाबदार आहेत', असे तिने हातावर लिहून फिनेल पिले आहे.

07:54 September 03

big breaking

जम्मू आणि काश्मीर : काल रात्री पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न झाला. घुसखोरीची कट भारतीय जवानांनी उधळून लावली. अशी माहिती संरक्षण विभागातील जनसंपर्क विभागाने दिली आहे.

Last Updated : Sep 3, 2021, 5:20 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.