मुंबई : तीन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या महाराष्ट्र भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आज मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक होत आहेत. या बैठकीत मोदी सरकारच्या 9 वर्षातील विकासकामे आणि आगामी बीएमसी निवडणुकीची तयारी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नसल्याची चर्चा आहे. दरम्यान दादर येथील वसंत स्मृती येथे आज बैठकीत मुंबई भाजपचे खासदार मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन यांच्यासह सर्वपक्षीय आमदार, पक्षाचे पदाधिकारी आणि विविध सेलच्या अध्यक्षांनाही बोलावण्यात आले आहे.
मुंबई पालिकेसाठी भाजपचे मिशन १५० : बैठकीबाबत पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई प्रदेश कार्यकारिणीची बैठक दर तीन महिन्यांनी बोलावली जाते. ही बैठक त्याचाच एक भाग आहे. मुंबई भाजपच्या बैठकीनंतर मुंबई जिल्हा बैठक होणार आहे. मुंबई पालिकेसाठी भाजपचे मिशन १५० आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रणनीती ठरवण्यात येत आहेत. कार्यकारिणीनंतर आता भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे.
मुंबई महापालिका निवडणुक : तीन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या महाराष्ट्र भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्याच्या एक दिवस आधी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा मुंबईत आले होते. मुंबईतील देवनार, रमाबाई नगर घाटकोपर, बोरिवली, कांदिवली पूर्व आणि पश्चिम, विलेपार्ले आणि सह्याद्री निवास येथे कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या दौऱ्यामुळे मुंबई भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'गुजरात पॅटर्न' वेळी वापरण्याची भाजपची योजना आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. भाजपमध्ये या बैठकीनंतर काही संघटनात्मक बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा :
Sanjay Raut News: दोन हजाराचे बंडल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे असतील- संजय राऊत
Deepak Kesarkar News: खुशखबर! मराठी तरुणांना मिळणार आता जर्मनीत रोजगार- दिपक केसरकर