ETV Bharat / state

दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचीत घट - maharashtra corona cases news

आज महाराष्ट्रात कोरोनाचे 5 हजार 210 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

today 5210 new corona positive patient found in maharashtra
दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचीत घट
author img

By

Published : Feb 22, 2021, 9:53 PM IST

मुंबई - आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 15 फेब्रुवारीला 3 हजार 365, 16 फेब्रुवारीला 3 हजार 663 रुग्ण आढळून आले होते. 18 फेब्रुवारीला 5 हजार 427, 19 फेब्रुवारीला 6 हजार 112, 20 फेब्रुवारीला 6 हजार 281, 21 फेब्रुवारीला 6 हजार 971 रुग्ण आढळून आले होते. गेल्या पाच ते सहा दिवसात रुग्णसंख्या वाढली होती आज त्यात काही प्रमाणात घट झाली आहे. आज 5 हजार 210 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

5 हजार 210 नवीन रुग्ण -
आज राज्यात 5 हजार 210 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 लाख 06 हजार 094 वर पोहोचला आहे. तर आज 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 806 वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 94.96 टक्के तर मृत्यू दर 2.46 टक्के आहे. राज्यात आज 5 हजार 035 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 99 हजार 982 वर पोहोचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 57 लाख 93 हजार 424 नमुन्यांपैकी 21 लाख 06 हजार 094 नमुने म्हणजेच 13.34 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 24 हजार 054 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 53 हजार 113 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्ण संख्या वाढली -
राज्यात दोन महिन्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात 11 डिसेंबरला 4 हजार 268, 12 डिसेंबरला 4 हजार 269, 16 डिसेंबरला 4 हजार 304 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर यात घट होऊन 2 ते 3 हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 4 हजार 092, 15 फेब्रुवारीला 3 हजार 365, 16 फेब्रुवारीला 3 हजार 663, 17 फेब्रुवारीला 4 हजार 787, 18 फेब्रुवारीला 5 हजार 427, 19 फेब्रुवारीला 6 हजार 112, 20 फेब्रुवारीला 6 हजार 281, 21 फेब्रुवारीला 6 हजार 971 तर आज काही प्रमाणात घट होऊन 5 हजार 210 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

आज या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई पालिका - 761
  • ठाणे पालिका - 132
  • नवी मुंबई पालिका - 108
  • कल्याण डोंबिवली पालिका - 134
  • नाशिक पालिका - 127
  • अहमदनगर - 81
  • जळगाव - 70
  • जळगाव पालिका - 65
  • पुणे - 145
  • पुणे पालिका - 336
  • पिंपरी चिंचवड पालिका - 207
  • औरंगाबाद पालिका - 194
  • अकोला पालिका -167
  • अमरावती - 94
  • अमरावती पालिका - 555
  • यवतमाळ - 94
  • बुलढाणा - 135
  • वाशीम - 50
  • नागपूर - 130
  • नागपूर पालिका - 643
  • वर्धा - 90

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.