मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी(20 सप्टेंबर) २५८३ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात मंगळवारी (२१ सप्टेंबर) किंचित वाढ होऊन ३१३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मंगळवारी ४०२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- राज्यात ४०, ७१२ सक्रिय रुग्ण -
राज्यात मंगळवारी दिवसभरात ४०२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ६३,४४,७४४ झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३१३१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आतापर्यंत एकूण १,३८,६१६ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७३ लाख ७ हजार ८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख २७ हजार ६२९ (११.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ७२ हजार ०९८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या ४०,७१२ सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा - अनिल परबांचा किरीट सोमैयांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
- रुग्णसंख्येत चढउतार -
२६ ऑगस्टला ५१०८, ३० ऑगस्टला ३७४१, ३१ ऑगस्टला ४१९६, १ सप्टेंबरला ४४५६, २ सप्टेंबरला ४३४२, ३ सप्टेंबरला ४३१३, ४ सप्टेंबरला ४१३०, ५ सप्टेंबरला ४०५७, ६ सप्टेंबरला ३६२६, ७ सप्टेंबरला ३९८८, ८ सप्टेंबरला ४१७४, ९ सप्टेंबरला ४२१९, १० सप्टेंबरला ४१५४, ११ सप्टेंबरला ३०७५, १२ सप्टेंबरला ३६२३, १३ सप्टेंबरला २७४०, १४ सप्टेंबरला ३५३०, १५ सप्टेंबरला ३७८३, १६ नोव्हेंबरला ३५९५, १७ सप्टेंबरला ३५८६, १८ सप्टेंबरला ३३९१, १९ सप्टेंबरला ३४१३, २० सप्टेंबरला २५८३, २१ सप्टेंबरला ३१३१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.
- मृत्यूदर २.१२ टक्के -
१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५, १० सप्टेंबरला ४४, ११ सप्टेंबरला ३५, १२ सप्टेंबरला ४६, १३ सप्टेंबरला २७, १४ सप्टेंबआ ५२, १५ सप्टेंबरला ५६, १६ नोव्हेंबरला ४५, १७ सप्टेंबरला ६७, १८ सप्टेंबरला ८०, १९ सप्टेंबरला ४९, २० सप्टेंबरला २८, २१ सप्टेंबरला ७० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्युदर नोंदवण्यात आला आहे.
- या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई - ३५७
अहमदनगर - ५८८
पुणे - ३७६
पुणे पालिका - १६६
पिपरी चिंचवड पालिका - १०२
सोलापूर - २४१
सातारा - २४७
सांगली - १७९
हेही वाचा - कर्नाटक: गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन अपार्टमेंटमध्ये भीषण आग; दोघांचा मृत्यू