ETV Bharat / state

महाराष्ट्र : आज 2216 नवीन कोरोना रुग्णांची भर; 15 रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Feb 8, 2021, 8:44 PM IST

आज राज्यात 2 हजार 216 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 46 हजार 287 वर पोहोचला आहे.

today 2216 new corona positive found in maharashtra
महाराष्ट्र : आज 2216 नवीन कोरोना रुग्णांची भर; 15 रुग्णांचा मृत्यू

मुंबई - आज राज्यात 2 हजार 216 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 46 हजार 287 वर पोहोचला आहे. तर आज 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 325 वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.73 टक्के तर मृत्यू दर 2.51 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज 3 हजार 423 रुग्ण बरे -
राज्यात आज 3 हजार 423 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 58 हजार 971 वर पोहोचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 50 लाख 10 हजार 037 नमुन्यांपैकी 20 लाख 46 हजार 287 नमुने म्हणजेच 13.63 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 67 हजार 764 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 34 हजार 720 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत

हेही वाचा - मुंबई : मोबाईल सीडीआर चोरीप्रकरणी दोन जणांना क्राईम ब्रांचने केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.