ETV Bharat / state

सोन्याची अंगठी चोरण्यासाठी तृतीयपंथीयांचा वेश; पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Theft Becoming Transgender

चोरी करण्यासाठी तृतीयपंथीयांचा वेश परिधानतीयपंथी बनून नजर उतरविण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत बोटातली मौल्यवान ( Dressed Like Transgender For Robbery ) अंगठी चोरून पसार होणाऱ्या दोघांना डी. बी. मार्ग पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. १५ हजार किमतीची अंगठी चोरली होती.

Dressed Like Transgender For Robbery
तृतीयपंथी बनून चोरी
author img

By

Published : Dec 3, 2022, 9:50 AM IST

मुंबई : तृतीयपंथी बनून नजर उतरविण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत बोटातली मौल्यवान ( Dressed Like Transgender For Robbery ) अंगठी चोरून पसार होणाऱ्या दोघांना डी. बी. मार्ग पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. या भामट्यांनी एका १८ वर्षीय विद्यार्थिनीची नजर उतरविण्याच्या बहाण्याने १५ हजार किमतीची अंगठी चोरली होती. याप्रकरणी डी बी मार्ग पोलिसांनी दोघांना कळव्यातून अटक केली ( Theft Becoming Transgender ) आहे. रितेश शेषराव सोलंकी (२०) आणि अमर दादाराव शिंदे (२३) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

transgender
तृतीयपंथी

नजर उतरविण्याचा बहाणा : ग्रॅण्ट रोड परिसरात राहणारी विद्यार्थिनी टोपीवाला लेन कॉर्नर परिसरातून जात असताना दोघा तृतीयपंथीयांनी तिला अडवून नजर उतरविण्याचा बहाणा केला. त्यांनी तरुणीच्या बोटात असलेली सोन्याची अंगठी काढून ( Stole Gold Ring ) घेतली. तरुणीला समजण्याआधीच फरार झाले होते. थोडया वेळानंतर तरुणीला बोटातील अंगठी गायब असल्याचे लक्षात येताच तिने डी बी मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी तत्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करीत असताना ते भामटे कळवा परिसरत रहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कळवा पोलिसांच्या मदतीने घोलाई मंदिरच्या पाठीमागील बैठया चाळीतून रितेश सोलंकी आणि अमर शिंदे अशा दोघांना ताब्यात घेतले.

कळवा परिसरत रहत असल्याची माहिती : डीबी मार्ग पोलिसांनी या दोघांविरोधात भादंवि कलम ४२० आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप खुडे, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजा बिडकर,पोलीस निरीक्षक अशोक पवार(गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्य्क पोलीस निरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार अशोक पाटील, पोलीस नामदार सुदर्शन शिंदे, पोलीस शिपाई प्रकाश कोळी मयूर पालवनकर, शेखर अभंग, दीपक डावरे आणि पोलीस शिपाई संतोष कदम यांनीही कारवाई करून आरोपींना जेरबंद केले आहे.

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी : या गुन्ह्यातील घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपीताचा सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करीत असताना गुप्त बातमीदार मार्फत सदर गुन्हामधील आरोपी हे कळवा, ठाणे येथील असल्याची तसेच ते राहत असलेल्या ठिकाणाची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहिती वरून सदर ठिकाणी जाऊन स्थानिक पोलीस ठाणे कळवा यांची पोलीस मदत घेवून आरोपी राहत असलेले घोलाई मंदिरच्या पाठीमागील बैठ्या चाळीतून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

तृतीयपंथी असल्याचे भासवून चोरी : कळवा पोलीस ठाणे येथे योग्य त्या नोंदी घेवून आरोपींना डी. बी. मार्ग पोलीस ठाणे मुंबई येथे आणण्यात आले. गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांचाकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले. हा गुन्हा करताना दोघांनीही महिलांचे कपडे परिधान करून तृतीयपंथी असल्याचे भासवले. समोरच्यांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक करण्याचे काम करत सदर गुन्हा त्यांनी संगनमताने केल्याची स्पष्ट कबुली दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.