मुंबई : मे महिन्यात उन्हाचा तडाखा हा खूप जास्त असतो. राज्यात उन्हाचे तापमान वाढत चालले आहे. कडक ऊन्हाच्या चटक्याने अनेकांनी आपला जीव गमवला आहे. मागील पाच महिन्यात राज्यात 12 जणांचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. उष्मघाताचा त्रास 2300 लोकांना झाल्याची माहिती समोर आली आहे. उकाडा वाढल्याने मुंबईत विजेची मागणी देखील वाढली आहे. सोमवारी 3500 मेगावॉटचा टप्पा पार केला आहे. मुंबईची कमाल वीज मागणी गेल्या वर्षी 3800 मेगावॉटची होती.
उन्हापासून स्वतःची अशी 'घ्या' काळजी : वारंवार आरोग्य विभागाकडून आवाहन केले जात आहे की, नागरिकांनी उन्हापासून स्वतःची काळजी घ्यावी. उन्हाळ्यात चहा, कॉफी, मद्यप्राशन सर्वप्रथम टाळा. हे पदार्थ उष्ण स्वरूपाचे असतात. मोकळे आणि फिक्या रंगाचे कपडे वापरा. गरज असेल तरच घराबाहेर पडा. मुंबईकरांनी 12 ते 3 या काळात घराबाहेर पडू नये. दररोज चार ते पाच लीटर पाणी प्यावे. डोक्यावर छत्री, टोपी, रुमाल वापरावा. शीत पेयाचा वापर करावा. प्रवास करते वेळी कांदा व पाणी सोबत ठेवावे. लिंबाचा रस पाण्यात घ्यावा. ओआरएस पाण्यातून घ्यावे. थंड ठिकाणी थांबावे, पंखा, कूलरचा वापर करा.
आरोग्याची काळजी : उन्हाचा तडाखा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. उन्हामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतात. डोळे लाल होणे, कानात ठणक बसने, शरीरातील पाणी कमी होणे, यामुळे अचानक चक्कर येणे असे प्रकारे होऊ शकतात. त्यामुळे आपली आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करावी. आपल्या आजूबाजूचा परिसर पाण्याने ओला ठेवला पाहिजे. दुपारच्या वेळेस आराम करावा. घराबाहेर पडलाच तर अंगभर कपडे घालावे.
उन्हात लहान मुलांना खेळायला घराबाहेर पाठवू नका. काळा कपड्यांचा वापर टाळावा आणि जास्तीत जास्त सुती कपड्यांचा वापर करावा. अशा प्रकारे आपण उन्हाळ्यात स्वतःचा बचाव करू शकतो - डॉ. निलेश हारदे
उन्हाळ्यात स्वतःचा बचाव : खाण्यात फळांचा वापर जास्त करा. काकडी गार खावे. एखादी व्यक्ती उष्माघाताने जर बाधित झाली, तर त्या व्यक्तीला लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात दाखल करावे. उष्माघातामुळे जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णालयात घेऊन जाणे सदैव लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
हेही वाचा :