ETV Bharat / state

ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनीच्या आव्हानात्मक दुरुस्तीसाठी जलविभाग सज्ज - ब्रिटीशकालीन तानसा जलवाहिनी फुटली

जी-दक्षिण विभागाच्या हद्दीत दीपक सिनेमाजवळील गावडे चौकात सुमारे १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) जलवाहिनीची गळती दुरुस्ती करण्यात येणार आहे. ही जलवाहिनी ब्रिटिशकालीन तर आहेच. समवेत जमिनीच्या खाली व जलवाहिनीच्या आत शिरून दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याने हे काम तुलनेने आव्हानात्मक आहे.

pipeline
जलवाहिनी
author img

By

Published : Nov 30, 2020, 2:30 PM IST

मुंबई - ‘जी दक्षिण’ विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथे ब्रिटिशकालीन १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व मुख्य जल वाहिनीवरील मोठी गळती दुरुस्त करण्याचे आव्हानात्मक काम २ व ३ डिसेंबर २०२० रोजी हाती घेण्यात येणार आहे. जवळपास दहा दिवसांपूर्वी या गळतीचा शोध लागल्यानंतर त्याची तात्पुरती दुरुस्ती करुन गळती रोखण्यात आली. आता संपूर्ण व मूळ दुरुस्ती करण्यासाठी जलकामे उपविभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

आव्हानात्मक काम -
जी-दक्षिण विभागाच्या हद्दीत दीपक सिनेमाजवळील गावडे चौकात सुमारे १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) जलवाहिनीची गळती दुरुस्ती करण्यात येणार आहे. ही जलवाहिनी ब्रिटिशकालीन तर आहेच. समवेत जमिनीच्या खाली व जलवाहिनीच्या आत शिरून दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याने हे काम तुलनेने आव्हानात्मक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातील सहाय्यक अभियंता (जलकामे) (तातडीचा दुरुस्ती विभाग) या उपविभागाच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे.

असा लागला गळतीचा शोध -
१८ नोव्हेंबर २०२० रोजी या जलवाहिनीला मोठी गळती असल्याचा तसेच तेथे रस्ता खचल्याचा संदेश प्रशासनाला प्राप्त झाला. तेव्हा जल खात्यातील तातडीचा दुरुस्ती विभागाने (वरळी) सर्व यंत्रसामुग्री सहीत तात्काळ या ठिकाणी दाखल होऊन दुरुस्तीची कामे हाती घेतली. प्रारंभी, गळती शोधक पथकाने अल्ट्रासाऊंडिंग रॉड पद्धतीने निश्चित केलेल्या ठिकाणी खोदकाम केले. सुमारे २ ते ३ दिवस अखंडपणे हे खोदकाम सुरू होते. मुख्य गटार तसेच मुख्य पर्जन्य जलवाहिनी यांच्या खालून जलवाहिनी जात असल्याची शक्यता होती. तसेच टाटा विद्युत कंपनीच्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या यांचाही खोदकामात अडथळा होता. त्यामुळे हे खोदकाम अत्यंत गुंतागुंतीचे व जोखमीचे होते. मात्र, कौशल्य व समन्वयातून जलकामे दुरुस्ती विभागाने ते योग्यरित्या पार पाडले. विशेष म्हणजे हे काम करताना, संबंधित परिसर व विभागातील पाणीपुरवठा बंद न करता बाहेरून हे काम करण्यात आले.

तात्पूर्ती गळती रोखली -
सुमारे २५ ते ३० फूट खोदकाम केल्यानंतर १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) या जलवाहिनीतून मोठी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. ही जलवाहिनी जमिनीमध्ये २५ फूट खोल तर होतीच, सोबतच तिला तळाला मोठ्या प्रमाणात गळती होती. अथक प्रयत्न करून गळतीच्या ठिकाणी प्रथम लाकडी पाचर ठोकून व त्यावर एम.एस. पॅच स्क्रू जॅकच्या सहाय्याने गळती रोखण्यात आली. मात्र जलवाहिनीच्या पुढील बाजूने तळापासून गळतीचे पाणी येत असल्याचे निदर्शनास आले. तेथे दुसरी मोठी गळती असण्याची शक्यता होती. ती गळती बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र खाली कठीण पाषाण असल्याने अधिक खोलवर खोदकाम करणे शक्य नव्हते. त्यामुळे पुढील दुरुस्ती जलवाहिनीवर मॅनहोल लावून आत जाऊन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. या कारणाने दिनांक २ व ३ डिसेंबर रोजी दुरुस्तीचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे.

गळती जवळ दुसरा खड्डा -
ही दुरुस्ती करण्यासाठी गळतीच्या जवळच दुसरा खड्डा खोदण्यात आला. तेथे १५ ते २० फूट खोलवर खोदकाम पूर्ण झाले आहे. शोअरिंग प्लेट्स खड्ड्याच्या सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून खड्डा सुरक्षित करण्यात आला आहे, जेणेकरुन खड्ड्यात दगड-माती पडू नये. तसेच जलवाहिनीवर २४ इंचाचे दोन मॅनहोल ड्राय वेल्डिंग करून बसविण्यात आले आहेत. एका मॅनहोलद्वारे जलवाहिनीच्या आत असलेल्या पाण्याचा उपसा सबमर्सिबल पंपाने करता यावा व दुसऱया मॅनहोलमधून कामगारांना, पंपांचा अडथळा न येता, आत शिरुन दुरुस्ती सहजपणे करता येईल, अशी ही आखणी आहे. या कामासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामुग्री तपासणी करुन सज्ज ठेवण्यात आली आहे.

पाणी बंद आणि कपात -
दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेनंतर या जलवाहिनीवरील मुख्य झडपा बंद करुन त्यानंतर दोन्हीही मॅनहोल कापून, जल वाहिनीतील पाणी पूर्णपणे बाहेर काढले जाईल. नंतर जलवाहिनीच्या आत शिरुन पूर्ण निरीक्षण केले जाईल. गळतीमुळे जलवाहिनीचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे, किती ठिकाणी गळती आहे, त्याचा अंदाज घेऊन त्यानुसार दुरुस्ती कामाला सुरूवात करण्यात येईल. दिनांक ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या दुरुस्ती कालावधीत ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

सहकार्याचे आवाहन -
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) तथा जल अभियंता तथा अजय राठोर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपजलअभियंता (परिरक्षण) विभूते, उप जलअभियंता (शहर) कमलापूरकर, जलकामे विभागाचे सहाय्यक अभियंता जीवन पाटील व त्यांचे सहकारी पथक ही दुरुस्ती करणार आहेत. दुरुस्ती कालावधीत संबंधित परिसरातील नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा - नागपुरात कार चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर नेले फरफटत; घटना सीसीटीव्हीत कैद

हेही वाचा - 'शेतकरी आहेत म्हणून देश आहे; मोदींनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी..'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.